घटस्फोटानंतर नागाचं दुसरं लग्नही झालं, तरी समंथासोबतच्या 'वेडिंग डेट'चा टॅटू अजूनही हातावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:04 IST2024-12-19T17:02:22+5:302024-12-19T17:04:53+5:30
समंथानेही अद्याप chay (नागाचं निकनेम) हा टॅटू काढलेला नाही अशी चर्चा आहे.

घटस्फोटानंतर नागाचं दुसरं लग्नही झालं, तरी समंथासोबतच्या 'वेडिंग डेट'चा टॅटू अजूनही हातावर
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यने (Naga Chaitanya) काही दिवसांपूर्वीच दुसरं लग्न केलं. शोभिता धुलिपालासोबत त्याने पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली. २०१७ साली नागाचं पहिलं लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभूसोबत (Samantha Ruth Prabhu) झालं होतं. दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मात्र २०२१ साली त्यांचा घटस्फोट झाला. आता दुसरं लग्न झाल्यानंतरही नागा चैतन्यच्या हातावर समंथासोबतच्या लग्नाच्या तारखेचा टॅटू तसाच आहे. यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.
नागा चैतन्य आणि समंथाचं लग्न १० ऑक्टोबर २०१७ रोजी झालं होतं. नागा आणि समंथाची लव्हस्टोरी खूप चर्चेत होती. दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. अनेक खास गोष्टींमधून त्यांचं प्रेम जगाला दिसायचं. त्यातच एक म्हणजे दोघांनीही हातावर टॅटू केला होता. नागा चैतन्यच्या हातावर morse code टॅटू आहे ज्यात त्याची आणि समंथाच्या लग्नाची तारीख कोरलेली आहे. इतकंच नाही तर हा टॅटू आजही त्याच्या हातावर आहे. ही गोष्ट माहित नसताना काही चाहत्यांनी असाच टॅटू काढला. म्हणून नागाने स्पष्टीकरण देत सांगितले की 'हा टॅटू म्हणजे माझ्या पहिल्या लग्नाची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही तो कॉपी करु नका. मला फार वाईट वाटलं जेव्हा चाहत्यांनी ते कॉपी केलं. कारण गोष्टी तशाच राहतील असं नाही.
तर दुसरीकडे समंथानेही chay असं लिहिलेला टॅटू काढला होता. समंथानेही हा टॅटू अजूनही ठेवल्याची चर्चा आहे. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नागा चैतन्यला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावर तो म्हणाला, "मी अजून टॅटू काढण्याबद्दल विचार केला नाही. तसंही बदल करण्याची गरजही वाटत नाही. जसे आहे तसे ठीक आहे."