नागा चैतन्यने ८ तारखेलाच का केला शोभिताशी साखरपुडा? कारण, याच दिवशी Ex पत्नी समांथाने...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 10:57 IST2024-08-09T10:56:08+5:302024-08-09T10:57:04+5:30
नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुजा करण्यासाठी ८ तारीखच का निवडली? हे तुम्हाला माहितीये का? खरं तर या तारखेशी नागा चैतन्यची एक्स पत्नी समांथाचं कनेक्शन आहे.

नागा चैतन्यने ८ तारखेलाच का केला शोभिताशी साखरपुडा? कारण, याच दिवशी Ex पत्नी समांथाने...
साऊथ स्टार नागा चैतन्यने बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला आहे. समांथा रुथ प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर ३ वर्षांनी नागा चैतन्य पुन्हा संसार थाटण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ८ ऑगस्टला नागा चैतन्य आणि शोभिताने साखरपुडा करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, नागा चैतन्यने शोभिताशी साखरपुजा करण्यासाठी ८ तारीखच का निवडली? हे तुम्हाला माहितीये का? खरं तर या तारखेशी नागा चैतन्यची एक्स पत्नी समांथाचं कनेक्शन आहे.
समांथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. त्यांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. पण, या दोघांनीही त्यांचं रिलेशनशिप जाहीर केलेलं नव्हतं. अखेर साखरपुडा करत नागा चैतन्य आणि शोभिताने त्यांच्या नात्याबाबत कबुली दिली. पण, नागा चैतन्य आणि शोभिताने ८ ऑगस्टला साखरपुडा करण्यामागचं कारण आता समांथा असल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार रिपोर्टनुसार, समांथाने काही वर्षांपूर्वी नागा चैतन्यला याच दिवशी प्रपोज केलं होतं. त्यामुळे नागा चैतन्यने ८ ऑगस्टलाच शोभिताबरोबर साखरपुडा केल्याने समांथाच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त करत त्याला ट्रोल केलं आहे.
नागा चैतन्य आणि समांथाने २०१७ साली लग्न करत संसार थाटला होता. त्यांच्याकडे साऊथमधील आदर्श कपल म्हणून पाहिलं जायचं. पण, काही कारणांमुळे २०२१ मध्ये घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.