काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:22 IST2025-06-15T15:21:31+5:302025-06-15T15:22:26+5:30

संगीतकार आणि गायक रविचंदर हा थलायवा रजनीकांत यांचा भाचा आहे.

Music composer aniruddha Ravichander breaks silence on rumors of affair and marriage with Kavya Maran | काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"

काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"

आयपीएल टीम सनरायजर्स हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन (Kavya Maran) आणि संगीत दिग्दर्शक अनिरुद्ध रविचंदर (Anirudh Ravichander) यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु आहेत. दोघं अनेकदा एकत्र दिसले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत. रविचंदर हा थलायवा रजनीकांत यांचा भाचा आहे. स्वत: रजनीकांत लग्नाची बोलणी करतील अशाही चर्चा पसरल्या. पण आता या चर्चांवर अनिरुद्ध रविचंदरने मौन सोडलं आहे.

संगीतकार अनिरुद्ध रविचंदरने नुकतंच ट्वीट करत या चर्चांवरल भाष्य केलं आहे. त्याने लिहिले, "लग्न आह? हाहा..शांत व्हा मित्रांनो...कृपया या अफवा पसरवणं थांबवा."

कशा सुरु झाल्या डेटिंगच्या चर्चा

कौमुदी ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार, अनिरुद्ध आणि काव्या २०२४ मध्ये रिलेशनशिपमध्ये आले. नुकतेच ते लास वेगासमध्येही एकत्र होते. लास वेगासमध्ये एकत्र फिरतानाच्या त्यांच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र आता रविचंदरच्या या ट्वीटनंतर त्यांच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

वर्कफ्रंट

 अनिरुद्ध रविचंदर हा गायक आणि संगीतकार आहे. काही वर्षांपूर्वी आलेलं व्हायरल झालेलं 'व्हाय दिस कोलावरी डी' गाणं त्यानेच गायलं होतं. अनिरुद्ध देशातला सर्वात महागड्या गायकांपैकी एक आहे. प्रत्येक अल्बमसाठी तो कोट्यवधी रुपये घेतो. तर काव्या मारन सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची मुलगी आहे. काव्याने अमेरिकेत शिक्षण घेतलं आणि नंतर ती वडिलांच्या बिझनेसमध्ये आली. सध्या ती सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडच्या कार्यकारी संचालक पदावर आहे. 

Web Title: Music composer aniruddha Ravichander breaks silence on rumors of affair and marriage with Kavya Maran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.