'दृश्यम ३'मधला सस्पेन्स आधीच समजणार, मोहनलाल यांच्या मल्याळम सिनेमाची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:44 IST2026-01-07T13:44:10+5:302026-01-07T13:44:44+5:30
अजय देवगणचा 'दृश्यम ३' २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे त्याआधीच मल्याळम 'दृश्यम ३' येत आहे.

'दृश्यम ३'मधला सस्पेन्स आधीच समजणार, मोहनलाल यांच्या मल्याळम सिनेमाची घोषणा
सस्पेन्स थ्रिलर सिनेमांमध्ये 'दृश्यम'चं नाव आघाडीवर असतं. आतापर्यंत सिनेमाचे दोन भाग आले. तर आता 'दृश्यम ३'ची जोरदार चर्चा आहे. मल्याळममधील 'दृश्यम' आधी रिलीज होणार आहे. तर नंतर अजय देवगणचा 'दृश्यम ३' प्रदर्शित होईल. दरम्यान मल्याळममध्ये मोहनलाल यांच्या 'दृश्यम ३'ची रिलीज डेटही समोर आली आहे. सिनेमाचे दिग्दर्शक जीतू जोसेफ यांनीच हा खुलासा केला आहे.
अजय देवगणचा 'दृश्यम ३' २ ऑक्टोबर २०२६ रोजी रिलीज होणार आहे. तर मोहनलाल यांचा 'दृश्यम ३' एप्रिलमध्ये रिलीज होईल असं जीतू जोसेफ यांनी खुलासा केला आहे. जीतू जोसेफ नुकतेच एका रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पोहोचले होते. तेव्हा ते म्हणाले की 'दृश्यम ३' एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रिलीज होईल. सर्वांनी थिएटरमध्ये येऊन पाहा असंही त्यांनी आवाहन केलं.
जीतू जोसेफ पुढे म्हणाले, "दृश्यम एक असा सिनेमा आहे जो अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात आहे. सिनेमाकडून खूप अपेक्षा आहेत आणि मी सर्वांनाच विनंती करतो की सिनेमा पाहताना अपेक्षा बाजूला ठेवूनच पाहा. सिनेमाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाईल. आधी माझा 'वलथु वशथे कल्लन' सिनेमा आता ३० जानेवारीला येत आहे."
'दृश्यम ३' मल्याळम आणि हिंदी दोन्हीमध्ये एकाच दिवशी रिलीज होईल अशी चर्चा होती. मात्र आता तसं होणार नाही. 'दृश्यम २'ची गोष्ट जिथे संपली होती तिथूनच 'दृश्यम ३'ची कहाणी सुरु होणार आहे.