३५ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींच्या पार! 'हा' दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडवर पडतोय भारी; तुम्ही पाहिला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:19 IST2025-09-25T13:14:06+5:302025-09-25T13:19:15+5:30
३५ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींच्या पार! 'हा' दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडवर पडतोय भारी; तुम्ही पाहिला?

३५ कोटी बजेट अन् कमाई २०० कोटींच्या पार! 'हा' दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडवर पडतोय भारी; तुम्ही पाहिला?
2025 Biggest Hit Film : भारतामध्ये १२ हा महिने बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची चलती असते. यंदाचं वर्ष हे सिनेसृष्टीसाठी भरभराटीचं गेलं आहे. अनेक धाटणीच्या विषयांवर आधारित चित्रपट आले आणि त्यांना प्रेक्षकांनी अक्षरश डोक्यावर उचलून धरलं. सध्या मनोरंजनविश्वात अशाच एका चित्रपटांची चर्चा आहे. बॉलिवूड चित्रपटांना कॉंटे की टक्कर देत वाहत्या गंगेत हात धुवत या दाक्षिणात्य चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं नाव 'लोका-चॅप्टर १ 'असं आहे. २८ ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला.
डोमिनिक अरुण दिग्दर्शित 'लोका: चॅप्टर १' हा बहुचर्चित चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड चित्रपटांवर देखील भारी पडत आहे. अभिनेते टोविनो थॉमस आणि मल्याळम अभिनेत्री कल्याणी प्रियदर्शनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. यानंतर चित्रपटाची क्रेझ इतकी वाढली आहे की तो तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता हिंदीमध्येही प्रदर्शित करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या ३५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशभरात आतापर्यंत एकूण ₹१४१.०५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात ₹२७८.६० कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे. लवकरच लोका चॅप्टर-१चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करेल एवढं मात्र नक्की! प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक आणि समीक्षकांची चित्रपटाला दाद मिळते आहे.
असं आहे कथानक
'लोका चॅप्टर १' चित्रपटाची कथा चंद्रा नावाच्या एका मुलीभोवती फिरते. चंद्रा स्वीडनहून बंगळुरूला राहायला येते आणि एका फ्लॅटमध्ये राहते. तिचा शेजारी सनी नावाचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत राहत असतो. हळूहळू सनीला चंद्रा आवडू लागते आणि तो तिच्याशी मैत्री करण्यासाठी हात पुढे करतो. त्यानंतर मग खऱ्या कथानकाला सुरुवात होते.