थलपती विजयच्या 'लिओ'ने पहिल्याच दिवशी मोडला रजनीकांतच्या 'जेलर'चा रेकॉर्ड, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 11:50 AM2023-10-19T11:50:55+5:302023-10-19T11:51:41+5:30

Leo Box Office Collection : लिओ सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, जमवणार १०० कोटींचा गल्ला

Leo Box Office Collection Thalapathy Vijay movie breaks the record of Rajinikanth Jailor on its first day | थलपती विजयच्या 'लिओ'ने पहिल्याच दिवशी मोडला रजनीकांतच्या 'जेलर'चा रेकॉर्ड, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

थलपती विजयच्या 'लिओ'ने पहिल्याच दिवशी मोडला रजनीकांतच्या 'जेलर'चा रेकॉर्ड, बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर

दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा 'लिओ' हा बहुचर्चित चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर हा चित्रपट आज (१९ ऑक्टोबर) प्रेक्षकांच्या भेटीला आला. अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली होती. त्यामुळे या चित्रपटाची क्रेझ सर्वत्र असल्याचं दिसून आलं होतं. आता या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. 

'लिओ'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, थलापती विजयच्या 'लिओ'ने रजनीकांतच्या जेलरचा रेकॉर्डही मोडला आहे. तमिळ, हिंदी, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम अशा पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळत आहे. २५०-३०० कोटींचं बजेट असलेल्या 'लिओ' चित्रपट संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. 

'सॅकनिल्क'ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी भारतात तब्बल ८० कोटींचा गल्ला जमवू शकतो. तर जगभराच पहिल्याच दिवशी थलापती विजयचा 'लिओ' हा चित्रपट शंभर कोटींचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. अलिकडेच रजनीकांतचा जेलर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधून ४४.५ कोटींचा गल्ला जमवला होता. तर थलापती विजयच्या 'लिओ'ने अॅडव्हान्स बुकिंगमधून ४६.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.  'लिओ' चित्रपटात थलपती विजयबरोबर संजय दत्त, त्रिशा क्रिष्णन, लोकेश, प्रिया आनंद या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Leo Box Office Collection Thalapathy Vijay movie breaks the record of Rajinikanth Jailor on its first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.