मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 13:56 IST2025-06-20T13:55:20+5:302025-06-20T13:56:45+5:30

एका अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा अभिनेता मंदिराजवळ भीक मागताना दिसला. काय आहे यामागचं कारण

kubera movie actor seen begging near tirupati temple nagarjuna rashmika mandanna | मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का

मळके कपडे, वाढलेली दाढी, रापलेला चेहरा; अभिनेत्याची 'अशी' अवस्था बघून चाहत्यांना धक्का

वाढलेली दाढी, रापलेला चेहरा आणि तिरुपती मंदिरासमोर मागतोय भीक. अभिनेत्याची अवस्था बघून सर्वांना बसला धक्का. कोण आहे हा अभिनेता? हा अभिनेता आहे साउथ सुपरस्टार धनुष. सध्या मनोरंजन विश्वात तेलुगू–तामिळ चित्रपट ‘कुबेरा’ची चर्चा आहे. या सिनेमात धनुष, नागार्जुना, आणि रश्मिका मंदाना हे मुख्य भूमिका साकारत आहेत. या सिनेमातील भूमिकेसाठी धनुषने केलेली तयारी वाचून तुम्हीही अभिनेत्याच्या मेहनतीला सलाम कराल.

तिरुपतीच्या रस्त्यावर धनुषने मागितली भीक 

‘कुबेरा’ सिनेमासाठी धनुषने त्याच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी तिरुपतीच्या रस्त्यावर भिकारी बनून काही दिवस काढले. लोकप्रियतेच्या शिखरावर असूनही धनुषने भूमिकेचं गांभीर्य ओळखण्यासाठी तिरुपती मंदिराजवळ खरीखुरी भीक मागितली. धनुषच्या या कृतीचं सध्या खूप कौतुक होतंय. जेव्हा ‘कुबेरा’ सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हाच धनुषला आजवर कधीही न पाहिलेल्या या रुपात बघून चाहत्यांनी त्याची प्रशंसा केली आहे. याशिवाय ‘कुबेरा’ सिनेमासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘कुबेरा' सिनेमाची चर्चा

आज ‘कुबेरा’ सिनेमा देशभरात रिलीज झाला आहे. हा सिनेमा पहिल्या दिवशी ₹१५ कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तामिळ आणि तेलुगू भाषांतील दोन्ही आवृत्तीत या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 'कुबेरा'समोर आमिर खानच्या 'सितारे जमीन पर' सिनेमाचं तगडं आव्हान आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर 'कुबेरा' की सितारे जमीन पर कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Web Title: kubera movie actor seen begging near tirupati temple nagarjuna rashmika mandanna