Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:24 IST2025-10-02T11:21:13+5:302025-10-02T11:24:18+5:30
'कांतारा चाप्टर १' सिनेमा आज रिलीज झाला आहे. हा सिनेमा पाहून प्रेक्षकांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या कसा आहे सिनेमा

Kantara chapter 1 X Review: मनोरंजनाचा समुद्र नाही तर त्सुनामी! 'कांतारा चाप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) बहुप्रतिक्षित ॲक्शन-मायथोलॉजिकल चित्रपट 'कांतारा चॅप्टर १' (Kantara Chapter 1) आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्या भागाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर, प्रेक्षक 'कांतारा'च्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते. आता चित्रपट पाहिल्यानंतर नेटिझन्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर आपला जोरदार प्रतिसाद देत आहेत.
'कांतारा चॅप्टर १' पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी 'कांतारा चॅप्टर १' पाहून प्रेक्षक सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. अनेक युजर्सनी हा चित्रपट 'जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव' आणि 'अनोखं कथा' (divine storytelling) असल्याचं म्हटलं आहे.
नेटिझन्सच्या प्रतिक्रिया:
एका युजरने लिहिले, "या त्सुनामीला कोणी रोखू शकत नाही! 'कांतारा चॅप्टर १' - दैवी आणि अनोखी कथा, भन्नाट अभिनय आणि जबरदस्त सिनेमॅटिक अनुभव."
No one can stop this tsunami 🌊🔥 Kantara Chapter 1 divine storytelling, god-level performance, ultimate cinematic experience 🛐💥🕉️.#Kantara#KantaraChapter1pic.twitter.com/dXKctEC3WG
— A M R U T H (@PRKCultAMR) October 2, 2025दुसऱ्या एका युजरने ऋषभ शेट्टीची प्रशंसा करताना म्हटलं, "एवढा मोठा प्रोजेक्ट इतक्या आत्मविश्वासाने आणि पूर्णत्वाने पडद्यावर आणणं, त्याच वेळी अभिनय करणं ही लहान गोष्ट नाही. पडद्यावर चित्रपटाचा उच्च स्तर आणि निर्मितीचे मूल्य स्पष्टपणे दिसते."
#KantaraChapter1@shetty_rishab please take a bow. It’s no small feat to mount, execute, and at the same time perform in a project with such conviction and perfection. The scale and production values are all right there on screen. You can see the real effort in the storytelling,… pic.twitter.com/GLhmtDA2Ma
— Jiya Rahman (@jiyathedon) October 2, 2025काही युजर्सनी चित्रपटाची व्हिज्युअल्स (दृश्ये) अतिशय आकर्षक असल्याचं म्हटलं आहे, पण त्याचबरोबर काहींना हा सिनेमा पहिल्या भागापेक्षा इतका चांगला नाही, असंही म्हटलं आहे.
I’ve not seen anything more visually stunning on the big screen of late than Kantara: A Legend Chapter 1. The film, however, struggles to breathe, drowning in its own larger-than-life mysticism, off-screen and on it.
— Sucharita (@Su4ita) October 2, 2025
Original still superior. Review tomorrow.
'कांतारा चॅप्टर १' हा मायथोलॉजिकल-ॲक्शन चित्रपट ऋषभ शेट्टीने दिग्दर्शित केला आहे. ऋषभनेच या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाची भव्यता, कथाआणि ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचे प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत. एकूणच 'कांतारा चॅप्टर १' सिनेमा बॉक्स ऑफिसवर वादळ आणणार, यात शंका नाही