बॉक्स ऑफिसवर 'कांतारा चाप्टर १'चं साम्राज्य! सात दिवसात कमावले 'तब्बल' इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 11:14 IST2025-10-09T11:09:40+5:302025-10-09T11:14:31+5:30
'कांतारा चाप्टर १' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सात दिवसात किती पैसे कमावले, जाणून घ्या

बॉक्स ऑफिसवर 'कांतारा चाप्टर १'चं साम्राज्य! सात दिवसात कमावले 'तब्बल' इतके कोटी
साऊथचा सुपरस्टार अभिनेता रिषभ शेट्टी अभिनित आणि दिग्दर्शित 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरुच ठेवली आहे. दमदार कथानक आणि अप्रतिम ॲक्शनमुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी खेचणाऱ्या या चित्रपटाने आता ३०० कोटींचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या निवडक चित्रपटांच्या यादीत 'कांतारा चॅप्टर १' चा समावेश झाला आहे.
'कांतारा चॅप्टर १' ची एकूण कमाई
मिळालेल्या आकडेवारीनुसार, 'कांतारा चॅप्टर १' ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत सुमारे ३१६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आठवड्याच्या मधले दिवस असूनही, चित्रपटाने आपली कमाईची गती कायम ठेवली आहे. मंगळवारी या चित्रपटाने ३४.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तर बुधवारी यात थोडी घट झाली असली तरी, सुमारे २५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'कांतारा चॅप्टर १'ने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यश मिळवलं असून त्याचा परिणाम सिनेमाच्या कमाईवर आला आहे.
'कांतारा चॅप्टर १' च्या या जबरदस्त परफॉर्मन्समुळे इतर चालू असलेल्या बॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांच्या कमाईवर थेट परिणाम झाला आहे. अनेक बड्या चित्रपटांना 'कांतारा चॅप्टर १' समोर तिकीट खिडकीवर संघर्ष करावा लागत आहे. बॉलिवूडचा बिग बजेट आणि मल्टिस्टारर सनी संस्कारी की तुलसी कुमारी हा सिनेमा यामुळे फ्लॉप झाला असून प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद या सिनेमाला मिळत आहे.