दानशूर अभिनेता! ४६ व्या वर्षी मृत्यूने कवटाळलं; निधनाच्या धक्क्याने चाहत्यांनी केलेल्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 13:18 IST2025-10-29T13:08:46+5:302025-10-29T13:18:32+5:30
मोफत शाळा,अनाथआश्रमांसाठी केले लाखो दान! ४६ व्या वर्षी अभिनेत्याला मृत्यूने कवटाळलं, निधनाच्या धक्क्याने चाहत्यांनी संपवलं जीवन

दानशूर अभिनेता! ४६ व्या वर्षी मृत्यूने कवटाळलं; निधनाच्या धक्क्याने चाहत्यांनी केलेल्या आत्महत्या
Puneeth Rajkumar: पॉवरस्टार या उपाधिने गौरविलेले अभिनेते पुनीत राजकुमार हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेलं नाव. कन्नडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. २९ ऑक्टोबर २०२१ या दिवशी वयाच्या ४६ व्या वर्षी पुनीत राजकुमार यांचा हृदविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संपूर्ण कर्नाटकात खळबळ उडाली होती.त्यांच्या मृत्यूनंतर बंगळुरूमधील अनेक चित्रपटगृहे दिवसभर बंद राहिली आणि शहरात चित्रपटांच्या प्रमोशनवरही बंदी घालण्यात आली.
पुनीत राजकुमार जीममध्ये वर्कआउट करत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना जवळच्या विक्रम रुग्णालयात दाखल केलं.मात्र,त्यांची प्रकृती प्रंचड खालावली आणि त्यांचं निधन झालं. पुनीत राजकुमार यांचा जन्म १७ मार्च १९७५ रोजी सुपरस्टार डॉ. राजकुमार आणि निर्मात्या पर्वतम्मा राजकुमार यांच्या घरी झाला.त्यांना एकूण पाच अपत्ये होती तर पुनीत सगळ्यात लहान होते. अगदी बालपणापासून त्यांनी अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. पुनीत राजकुमार १० वर्षांचे असताना 'बेट्टाडा हुवू' या चित्रपटासाठी त्यांना अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
पुनीत राजकुमार यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अप्पू या चित्रपटामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. आपल्या करिअरमध्ये त्यांनी कन्नडमधील अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. वसंत गीता , भाग्यवंता , चालिसुवा मोडगालू , एराडू नक्षत्रगालू , भक्त प्रल्हाद, यारीवानु आणि 'बेट्टाडा हूवू' या सिनेमांमधील त्यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली.
२६ अनाथाश्रम अन् ४६ मोफत शाळा चालवल्या!
पुनीत राजकुमार कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते होते. त्यांचे १४ चित्रपट सलग १०० दिवस चित्रपटगृहात चालले होते. हा अभिनेता खऱ्या आयुष्यात एखाद्या देवदूतापेक्षा कमी नव्हता. समाजसेवेसाठी कायम ते तत्पर असायचे. ४६ मोफत शाळा, २६ अनाथाश्रम, १६ वृद्धाश्रम आणि १९ गोशाळा ते चालवायचे. याशिवाय अनेक शाळांनाही त्यांनी आर्थिक मदत केली. पुनीत यांची चाहत्यांची प्रचंड क्रेझ होती. पुनीत यांच्या मृत्यूनंतर, कर्नाटकातील १ लाख लोकांनी नेत्रदान केलं होतं. हा आकडा पुढे वाढतच गेला. त्यांचे चित्रपट पाहण्यासाठी थिएटर हाऊसफुल्ल असायचे. असंही सांगण्यात येतं त्यांच्या निधनाची बातमी ऐकून एका चाहत्याने आत्महत्या केली तर २ जणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.