Video: 'कंगुवा'चं पहिलं गाणं 'फायर' रिलीज, दोन्ही हातात तलवार घेऊन नाचला अभिनेता सूर्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 16:40 IST2024-07-23T16:39:57+5:302024-07-23T16:40:44+5:30

सूर्याचा जबरदस्त लूक लक्ष वेधून घेणारा आहे.

Kanguva first song release south superstar Surya s fire dance going viral | Video: 'कंगुवा'चं पहिलं गाणं 'फायर' रिलीज, दोन्ही हातात तलवार घेऊन नाचला अभिनेता सूर्या

Video: 'कंगुवा'चं पहिलं गाणं 'फायर' रिलीज, दोन्ही हातात तलवार घेऊन नाचला अभिनेता सूर्या

साऊथ सुपरस्टार सूर्या (Surya) चा आगामी सिनेमा 'कंगुवा' (Kanguva)ची खूप चर्चा आहे. चाहते सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'कंगुवा'च्या रिलीजला आणखी काही काळ प्रतिक्षा आहे. ऑक्टोबरमध्ये सिनेमा रिलीज होतोय. दरम्यान सिनेमाचं पहिलं गाणं 'फायर' रिलीज झालं आहे. गाण्याला प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत. यातील सूर्याचा जबरदस्त लूक लक्ष वेधून घेणारा आहे.

'कंगुवा'चं गाणं 'फायर' हे देवी श्री प्रसाद उर्फ डीएसपी आणि बी प्राकने बनवलं आहे. याचं म्युझिक खतरनाक आहे. शिवाय अप्रतिम बोल आणि कमाल एनर्जीमुळे 'फायर' गाणं ट्रेडिंगमध्ये आहे. 'फायर' तर सिनेमाची अल्बमची फक्त झलक आहे. यापुढील गाणी आणखी दमदार असणार आहेत. बी प्राकने गाणं गायलं असून डीएसपीने म्युझिक दिलं आहे. रकीब आलमने बोल लिहिले आहेत. 'फायर' गाण्याच्या व्हिडिओत अभिनेता सूर्या दोन्ही हातात तलवार घेऊन धमाकेदार डान्स करताना दिसत आहे.

'कंगुवा' 2024 चा बहुप्रतिक्षित सिनेमा आहे. 10 ऑक्टोबर रोजी सिनेमा रिलीज होतोय. सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत दुसरा तिसरा कोणी नाही तर बॉबी देओल आहे. तसंच दिशा पटानीही सिनेमात असल्याच्या चर्चा आहेत. 'कंगुवा' 350 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

Web Title: Kanguva first song release south superstar Surya s fire dance going viral