विवाहित अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी? दोन मुलांचा आहे बाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 11:40 IST2024-07-25T11:40:34+5:302024-07-25T11:40:52+5:30
साई पल्लवीच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ३२ वर्षीय साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विवाहित अभिनेत्याला डेट करतेय साई पल्लवी? दोन मुलांचा आहे बाप
साई पल्लवी ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'फिदा', 'मारी', 'लव्ह स्टोरी', 'कली', 'प्रेमम' अशा अनेक सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. साई पल्लवीचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या साई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. साई पल्लवीच्या डेटिंग लाइफबद्दल चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ३२ वर्षीय साई पल्लवी विवाहित अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, साई पल्लवी डेट करत असलेली व्यक्ती ही सिनेइंडस्ट्रीतील असून प्रसिद्ध अभिनेता आहे. ज्या व्यक्तीबरोबर साई पल्लवीच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. तो अभिनेता विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. साई पल्लवीच्या या डेटिंगच्या चर्चांनी सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. साई पल्लवीच्या चाहत्यांना मात्र यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे. साई डेट करत असलेली ती व्यक्ती नेमकी कोण आहे, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. पण, या चर्चांना उधाण आलेलं असतानाही साई पल्लवीने तिच्या डेटिंग लाइफबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, सध्या साई तिच्या आगामी सिनेमांच्या कामात व्यग्र आहे. 'अमारन' या तमिळ सिनेमातून साई पल्लवी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'India's Most Fearless: True Stories of Modern Millitary' या पुस्तकावर आधारित या सिनेमाची कथा असणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याबरोबरच नागा चैतन्यबरोबरही साई पल्लवी स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'थंडेल' या तेलुगु सिनेमात ते एकत्र दिसणार आहेत.