अखेर प्रतीक्षा संपली..! ज्युनिअर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 18:05 IST2024-01-08T18:04:45+5:302024-01-08T18:05:05+5:30
Devra Movie : मॅन ऑफ मासेस एनटीआर त्याच्या आगामी अॅक्शन ड्रामा देवरामध्ये त्याचा सर्वात दमदार अवतार दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात जान्हवी कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे.

अखेर प्रतीक्षा संपली..! ज्युनिअर एनटीआरच्या 'देवरा'ची पहिली झलक आली समोर
मॅन ऑफ मासेस एनटीआर त्याच्या आगामी अॅक्शन ड्रामा देवरामध्ये त्याचा सर्वात दमदार अवतार दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपटात जान्हवी कपूर आणि सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. निर्माते कोरतला सिवा दिग्दर्शित हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग, देवरा भाग १ जगभरात ५ एप्रिल २०२४ रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळममध्ये प्रदर्शित होणार आहे.
टी सीरिजने युट्यूबवर देवरा १ची पहिली झलक रिलीज केली आहे. या व्हिडीओत ज्युनिअर एनटीआरने साकारलेले पात्र पाहायला मिळते. या व्हिडीओच्या शेवटी अभिनेता बोलताना दिसतो आहे ती, या समुद्रात माशांपेक्षा जास्त रक्त आणि खंजर पाहिले आहेत म्हणूनच कदाचित याला लाल समुद्र म्हणतात. व्हिडीओत ज्युनिअर एनटीआर दमदार अॅक्शन करताना दिसतो आहे. ते पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या चित्रपटाची झलक पाहून अंगावर काटा येतो. टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरची उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.
या चित्रपटात प्रकाश राज, श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको, नारायण आणि इतर अनेक उल्लेखनीय कलाकार आहेत. देवरा हा नंदामुरी कल्याण राम यांनी सादर केलेला बहुप्रतिक्षित चित्रपट असून तो एनटीआर आर्ट्स आणि युवासुधा आर्ट्सच्या बॅनरखाली बनवला गेला आहे. मिक्किलीनेनी हे सुधाकर आणि हरी कृष्णाचे निर्माते आहेत. याचे संगीत सनसनाटी संगीतकार अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. श्रीकर प्रसाद हे या प्रकल्पाचे संपादक आहेत. रथनावेलू सिनेमॅटोग्राफी सांभाळत असून प्रोडक्शन डिझाईन साबू सिरिल सांभाळणार आहेत.