अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:48 IST2024-12-17T12:46:46+5:302024-12-17T12:48:05+5:30

Pushpa 2 OTT Release : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा 'पुष्पा २: द रुल' हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. पुष्पा २ ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Finally the wait is over! 'Pushpa 2' is coming to OTT, know when and where you can watch the movie | अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

अखेर प्रतीक्षा संपली! OTTवर दाखल होतोय 'पुष्पा २', जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सिनेमा

'पुष्पा २: द रुल'(Pushpa 2 The Rule)ने जवळपास सर्व भारतीय चित्रपटांना मागे टाकले आहे. अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा हा चित्रपट दररोज भरघोस कमाई करत आहे. 'पुष्पा २'ने आतापर्यंत जगभरात ११०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. १० दिवस उलटले तरी अल्लू अर्जुनच्या चित्रपटाची कमाई कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. थिएटरनंतर आता अभिनेत्याच्या चाहत्यांसह बरेच लोक OTT वर पुष्पा २च्या रिलीजची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे.

सोशल मीडियावर सुरू असलेल्या अफवांनुसार, अल्लू अर्जुनचा पुष्पा २ पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये ९ जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर अनेक भाषांमध्ये रिलीज होणार आहे. मात्र चित्रपट निर्मात्यांकडून अद्याप अधिकृतरित्या ओटीटी रिलीज संदर्भात घोषणा झालेली नाही. वास्तविकमध्ये चित्रपटगृहात रिलीज झाल्यानंतर ओटीटीवर चित्रपट येण्यासाठी ४०-५० दिवसांचा कालावधी लागतो. 

'पुष्पा २'मध्ये आहेत हे कलाकार
अल्लू अर्जुन पुन्हा एकदा सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ मध्ये पुष्पराजच्या भूमिकेत पाहायला मिळतो आहे. प्रत्येकजण त्याच्या अभिनयाचे आणि चित्रपटाच्या कथेचे कौतुक करत आहे. अल्लू अर्जुन व्यतिरिक्त, पुष्पा २ मध्ये रश्मिका मंदाना, फहाद फासिल, सुनील, राव रमेश आणि जगपती बाबू हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या सर्व लोकांच्या अभिनयाचे चित्रपटात खूप कौतुक होत आहे. पुष्पा २ चे बजेट जवळपास ५५० कोटी रुपये आहे. अवघ्या ३-४ दिवसांत बजेट वसूल करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला.

'पुष्पा २'चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
पुष्पा २चे बॉक्स ऑफिस कलेक्शन दमदार आहे. पुष्पा २ने १२ दिवसांत १४०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पुष्पा २चे बजेट जवळपास ५०० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नाही तर चित्रपटाने बजेटच्या जवळपास तिप्पट वसुली केली आहे आणि त्यातील एक मोठा भाग हिंदी आवृत्तीतून आला आहे.

Web Title: Finally the wait is over! 'Pushpa 2' is coming to OTT, know when and where you can watch the movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.