'पुष्पा ३'मधून फहाद फासिल OUT, दिग्दर्शकावर अभिनेता नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 09:52 IST2024-12-10T09:51:44+5:302024-12-10T09:52:41+5:30

Pushpa 2 Movie : साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २' या नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडून स्वतःचा एक नवा विक्रम रचला आहे.

Fahad Fasil OUT from 'Pushpa 3', actor upset with director | 'पुष्पा ३'मधून फहाद फासिल OUT, दिग्दर्शकावर अभिनेता नाराज

'पुष्पा ३'मधून फहाद फासिल OUT, दिग्दर्शकावर अभिनेता नाराज

साउथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) भारतातील सर्वात मोठा अभिनेता बनला आहे. त्याच्या 'पुष्पा २' (Pushpa 2) या नव्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड मोडून स्वतःचा एक नवा विक्रम रचला आहे. अल्लू अर्जुनची शैली आणि बिनधास्त वृत्तीमुळे हा चित्रपट सर्वत्र चर्चेत आहे. हिंदी भाषेतही या चित्रपटाने चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनच्या भूमिकेला आणखी एका अभिनेत्याने टक्कर दिली होती. पहिल्या भागात फहाद फासिल(Fahad Faasil)चं काम इतकं जबरदस्त होतं की त्याच्या चाहत्यांच्या अपेक्षा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाशीही जोडल्या गेल्या होत्या. पण या चित्रपटातील त्यांची भूमिका काही खास नव्हती. आता अशी माहिती मिळतेय की फहद फासिल 'पुष्पा ३' (Pushpa 3 Movie) मध्ये दिसणार नाही.

फहाद फासिल 'पुष्पा ३' मधून बाहेर

'पुष्पा २' चित्रपटाच्या शेवटी आपण पाहिले की चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याच्या तिसऱ्या भागाची घोषणा देखील केली. पुष्पा द रुलची कथा फक्त दुसऱ्या भागापुरती मर्यादित राहणार नाही. तिसऱ्या भागातही पुष्पा इंटरनॅशनल प्लेअर म्हणून दाखवण्यात येणार आहे. पण त्यात फहाद फासिलचे पात्र भंवर सिंग शेखावत यांचाही समावेश असेल का? हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. फहाद फासिल 'पुष्पा ३' मधून बाहेर पडला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याला चित्रपटाच्या भाग ३मध्ये कास्ट करण्याची संपूर्ण योजना केली होती, परंतु फहाद आणि दिग्दर्शक सुकुमार यांच्यातील मतभेदांमुळे ही योजना आता पुढे जाणार नाही.

मात्र, यावर फहाद किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांचा असा विश्वास होता की फहादचे पात्र भंवर सिंग अतिशय वाईट पद्धतीने सादर करण्यात आले आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात, फहादची व्यक्तिरेखा विनोदी सादर केली आहे जी खूपच विचित्र वाटते. चित्रपटाच्या पहिल्या भागात फहादचं काम जबरदस्त होतं, पण दुसऱ्या भागात तो तितका चांगला काम करू शकला नाही.

फवाद म्हणाला...
या वादाच्या आधीही फहादने एका मुलाखतीदरम्यान 'पुष्पा' या चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल सांगितले होते. चित्रपटातील त्याच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करताना तो म्हणाला होता की, '''पुष्पा या चित्रपटाने कलाकार म्हणून माझ्यासाठी काहीही केले नाही. सुकुमार सरांनाही मी तेच सांगतो. मला काहीही लपवायची गरज नाही. मी पूर्ण सत्य सांगत आहे. मी मल्याळम इंडस्ट्रीत माझे काम करत आहे.'' 'पुष्पा २'च्या क्लायमॅक्समध्ये या चित्रपटाचा नवा खलनायक सादर करण्यात आला होता, त्यानंतर फहादचे पात्र चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याचे समजते. पुष्पा हा चित्रपट सुरुवातीला दोन भागात बनवला जात होता, मात्र चित्रपटाची कथा पुढे नेण्यात आली आहे आणि आता चित्रपटाला मिळालेले यश पाहून असे वाटते की चित्रपटाचे कदाचित फ्रेंचायझीमध्ये रूपांतर होईल. तिसऱ्या भागात दिग्दर्शक सुकुमार पुष्पाची कथा संपवणार की कथा पुढे नेणार हे पाहणे बाकी आहे.

Web Title: Fahad Fasil OUT from 'Pushpa 3', actor upset with director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.