प्रभासच्या 'सालार २' संदर्भात मोठी अपडेट, अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 20:00 IST2024-04-10T20:00:00+5:302024-04-10T20:00:01+5:30
Prithviraj Sukumaran : 'बडे मियाँ छोटे मियाँ'चा खलनायक आणि दाक्षिणात्य अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन याने 'सालार २' बाबत एक अपडेट दिली आहे. 'सालार २'च्या रिलीज डेट आणि शूटिंगबाबत त्याने खुलासा केला आहे.

प्रभासच्या 'सालार २' संदर्भात मोठी अपडेट, अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनचा खुलासा
साउथ अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) सध्या 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या रिलीजमुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार-टायगर श्रॉफच्या चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, पृथ्वीराज सुकुमारनने 'सालार २' बाबत अपडेट शेअर केली आहे. प्रभासचा 'सालार' गेल्या वर्षी रिलीज झाला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता. या चित्रपटाची कथा जाणून घेण्यासाठी चाहत्यांनाही खूप उत्सुकता आहे.
प्रशांत नीलच्या 'सालार २'वर पृथ्वीराज सुकुमारन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'व्हरायटी'शी झालेल्या संवादात त्याने सांगितले की, हा चित्रपट २०२५ पर्यंत रिलीज होऊ शकतो. म्हणजे पुढच्या वर्षी प्रेक्षकांना सालार भाग २ ची भेट मिळू शकते. तथापि, निर्मात्यांनी अद्याप त्याच्या सिक्वेलबद्दल काहीही सांगितलेले नाही.
'सालार २' चे शूटिंग
'सालार २'च्या शूटिंगबाबत पृथ्वीराज सुकुमारन म्हणाला की, त्याच्या पुढच्या भागाचे शूटिंग काही दिवसांत सुरू होणार आहे. प्रशांत नीलने या चित्रपटासाठी जोरदार योजना आखल्या आहेत. त्याने शूटिंगसाठी तयारी केली आहे आणि वेळेवर काम केले आहे. पृथ्वीराज सुकुमारनने स्वतः 'सालार २' वर कधी काम करणार आहे, ते सांगितले. तो म्हणाला की, 'एम्पुरन'च्या शूटिंगदरम्यान प्रभासच्या चित्रपटासाठी वेळ काढणार आहे. २०२५ मध्ये 'सालार २' रिलीज होऊ शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. पण हे कधी आणि कसे होईल हे प्रशांत आणि होंबल फिल्म्सवर अवलंबून आहे.
'बडे मियाँ छोटे मियाँ' नाकारणार होता
'न्यूज 18'ला दिलेल्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज सुकुमारनने सुरुवातीला अक्षय कुमारचा चित्रपट नाकारणार असल्याचे सांगितले. खरंतर चित्रपटाच्या तारखांचा मुद्दा होता. पण अली अब्बास जफरचा चित्रपट करायचा हे त्याला पटवून देणारी व्यक्ती प्रशांतच होती. अशा प्रकारे तो बडे मियाँ छोटे मियाँशी जोडला गेला.