मला पैसे नको, माझा नवरा हवाय! घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे अभिनेत्याचं दुसरं लग्न, पत्नी म्हणते- "मला आत्महत्येशिवाय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:13 IST2025-09-16T12:12:27+5:302025-09-16T12:13:04+5:30
पवन सिंह त्याची दुसरी पत्नी ज्योतीसोबत घटस्फोट घेत आहे. पण, अभिनेत्याच्या पत्नीला मात्र त्याच्यापासून दूर जायचं नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पनव सिंहची दुसरी पत्नी ज्योतीने याबाबत भाष्य केलं आहे.

मला पैसे नको, माझा नवरा हवाय! घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे अभिनेत्याचं दुसरं लग्न, पत्नी म्हणते- "मला आत्महत्येशिवाय..."
सिनेइंडस्ट्रीतील घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सध्या अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्याचं दुसरं लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार अभिनेता पवन सिंह त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पवन सिंह त्याची दुसरी पत्नी ज्योतीसोबत घटस्फोट घेत आहे. पण, अभिनेत्याच्या पत्नीला मात्र त्याच्यापासून दूर जायचं नाहीये. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पनव सिंहची दुसरी पत्नी ज्योतीने याबाबत भाष्य केलं आहे.
ज्योतीने नुकतीच पब्लिक एंटरटेनमेंटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सांगितलं की "कायदेशीररित्या पवन सिंहसोबत घटस्फोट झाला असता तर त्याची अर्धी संपत्ती मला मिळाली असती. पण, मला पैसे नको आहेत. मला त्यांची संपत्ती किंवा पैशांशी काहीच घेणंदेणं नाही. मला फक्त माझा नवरा परत हवाय. जोपर्यंत न्यायालयात ही गोष्ट जात नाही तोपर्यंत मीच त्यांची पत्नी आहे. पण त्यांची टीम मला त्यांना भेटू देत नाही. मला फक्त एकदा माझ्या नवऱ्याला भेटून त्याच्याशी बोलायचं आहे". ज्योतीने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये ती म्हणाली होती की पवन सिंह तिला भेटत नाही किंवा बोलतही नाही. त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचं ज्योतीने सांगितलं होतं.
दरम्यान, ज्योती ही अभिनेता पवन सिंहची दुसरी पत्नी आहे. पवनने २०१४मध्ये नीलम सिंहसोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, लग्नानंतर तीन महिन्यांतच नीलमचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१८मध्ये पवन सिंहने ज्योतीसोबत दुसरं लग्न केलं. पण, काही काळानंतर त्यांच्या नात्यात बिनसलं. सध्या पवन सिंह 'राइज अँड फॉल' या रिएलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे.