प्रसिद्ध गायिकेने दिली गुडन्यूज! लग्न न करताच झाली आई, दाखवला गोंडस बाळाचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:39 IST2025-09-11T11:39:03+5:302025-09-11T11:39:22+5:30

गायिकेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. लग्न न करताच ही गायिका आई झाली आहे. ही गायिका म्हणजे भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय सिंगर देवी आहे. 

bhojapuri singer devi become mother deliver baby without marriage blessed with baby boy | प्रसिद्ध गायिकेने दिली गुडन्यूज! लग्न न करताच झाली आई, दाखवला गोंडस बाळाचा चेहरा

प्रसिद्ध गायिकेने दिली गुडन्यूज! लग्न न करताच झाली आई, दाखवला गोंडस बाळाचा चेहरा

लोकप्रिय आणि प्रसिद्ध असलेल्या गायिकेने गुडन्यूज दिली आहे. प्रसिद्ध गायिका आई झाली आहे. सोशल मीडियावरुन ही गुडन्यूज तिने चाहत्यांना दिली आहे. गायिकेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. लग्न न करताच ही गायिका आई झाली आहे. ही गायिका म्हणजे भोजपुरी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय सिंगर देवी आहे. 

देवीने ऋषिकेशमधील एम्स रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. तिला पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. सोशल मीडियावर देवीने तिच्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. "मेरा बाबू है" असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत चाहत्यांनी देवीला शुभेच्छा दिल्या आहेत. देवी स्पर्म बँकच्या मदतीने प्रेग्नंट राहिली होती. जर्मनीमध्ये तिने ट्रीटमेंट घेतल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं होतं. ७ वर्षांपूर्वीही तिने असा प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला होता. 


मात्र आता स्पर्म बँकच्या मदतीने देवीने गरोदर राहत एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. लोकगीतांमुळे देवीला प्रसिद्धी मिळाली होती. ती भोजपुरीमधली लोकप्रिय सिंगर आहे. ५० पेक्षा जास्त अल्बम साँग तिने गायले आहेत. तिचं 'पिया गईले कलकतवा ए सजनी' हे गाणं लोकप्रिय झालं होतं. 'दिल तुझे पुकारे आजा', 'अईले मोरे राजा', 'ओ गोरी चोरी-चोरी' और 'परदेसिया-परदेसिया' या गाण्यांना प्रसिद्धी मिळाली होती. 

Web Title: bhojapuri singer devi become mother deliver baby without marriage blessed with baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.