अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 17:46 IST2024-02-25T17:44:29+5:302024-02-25T17:46:20+5:30
'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनच्या लेकाने शाहरुखच्या डंकीमधलं गाणं त्याच्या खास अंदाजात गायलंय. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय (Allu Arjun, Shahrukh Khan)

अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल
'पुष्पा' फेम (Pushpa) अल्लू अर्जुनचं प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) लेक मात्र शाहरुखचा जबरा फॅन दिसून आला. कारणही तसंच खास घडलं. अल्लू अर्जुनच्या लेकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओत अल्लूचा लेक शाहरुखच्या (Shahrukh Khan) 'डंकी' मधलं 'लुट पुट गया' हे गाणं त्याच्या खास अंदाजात गाताना दिसतोय.
काहीच दिवसांपुर्वी अल्लू अर्जुनची मुलगी अरहा हिचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अरहाने बॉबी देओलच्या 'जमाल कुडू' गाण्यावर खास डान्स केला. अशातच अल्लूचा मुलगा अयानने शाहरुखचं 'लुट पुट गया' गाणं गायलं. इतकंच नव्हे तर मस्तीखोर अंदाजात डान्सही केला. अयान फक्त १० वर्षांचा आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अयानच्या बिनधास्त वागण्याचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय.
Lutt Putt Gaya version by Allu Arjun's son Allu Ayaan 🫶🏻@iamsrk@alluarjun#SRK#ShahRukhKhan#AlluArjun#AlluAyaan#KingKhan#Dunkipic.twitter.com/d6lKB8IKON
— Shah Rukh Khan Universe Fan Club (@SRKUniverse) February 24, 2024
अनेकांनी अल्लूच्या मुलाला क्यूट म्हणत व्हिडीओला चांगलीच पसंती दिलीय. अल्लू नेहमी त्याच्या कुटुंबाचे मजेशीर क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो. अल्लूची दोन्ही मुलं अयान आणि अरहा सुद्धा त्यांचे कलागुण सोशल मीडियावर दाखवत असतात. अल्लू अर्जुनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर.. तो लवकरच 'पुष्पा 2' च्या माध्यमातून लोकांच्या भेटीला येणार आहे.