2 वर्ष जुन्या 'त्या' ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 15:18 IST2024-12-08T15:18:02+5:302024-12-08T15:18:20+5:30

ल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2' हा सिनेमा 2 वर्ष जुन्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये.

Allu Arjun's Pushpa 2 Failing To Break The Record Of Kgf Chapter 2 | 2 वर्ष जुन्या 'त्या' ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2'

2 वर्ष जुन्या 'त्या' ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही अल्लू अर्जूनचा 'पुष्पा 2'

सुपरस्टार अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' सिनेमा 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. सुमारे 400-500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या 'पुष्पा 2' ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पण, अल्लू अर्जूनचा हा  2 वर्ष जुन्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये. तर कोणता आहे तो चित्रपट जाणून घ्या. 

 सर्वत्र फक्त 'पुष्पा 2' आणि 'पुष्पा राज'चीच चर्चा होत आहे. या चित्रपटाने 'RRR', 'जवान', 'पठाण' आणि 'सालार' सारख्या मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. परंतु, केवळ 100 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या आणि रिलीजच्या पहिल्याच दिवशी त्याच्या बजेटपेक्षा कितीतरी पटीने जास्त कमाई केलेल्या चित्रपटाचा विक्रम अद्याप 'पुष्पा 2' मोडू शकलेला नाही. तर तो सिनेमा आहे 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'KGF: Chapter 2'.

'पुष्पा 2'नं 5 डिसेंबर (गुरुवार) रोजी पहिल्याच दिवशी 164 कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कमाईत काहीशी घट झाली. सिनेमाने 93.8 कोटी कमावले. मात्र तिसऱ्या दिवशी म्हणजेच काल शनिवारी सिनेमाने पुन्हा झेप घेत 115 कोटींचा बिझनेस केला. यासोबतच सिनेमाची देशातील आतापर्यंत एकूण 383.7 कोटी  रुपये आहे. तर जगभरात 'पुष्पा'ने 500 कोटींचा आकडा पार केला आहे. पण,  'KGF: Chapter 2'नं सिनेमानं पहिल्याच दिवशी आपलं बजेट वसून केलं होतं. 100 कोटी कोटी बजेट असलेल्या 'KGF: Chapter 2' ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर बजेटपेक्षा जास्त कमाई करत विक्रम केला होता. 

दरम्यान, कर्नाटक राज्यात 'KGF: Chapter 2' पहिल्या दिवशी 30 कोटींहून अधिक कमाई केली होती. कर्नाटकात आतापर्यंत कोणताच सिनेमा 'KGF: Chapter 2' रेकॉर्ड मोडू शकला नाहीये.  'पुष्पा 2' सिनेमादेखील  'KGF: Chapter 2' मागे टाकू शकला नाही. कर्नाटकात पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत 'पुष्पा 2' हा 'KGF: Chapter 2' रेकॉर्ड तोडण्यात अपयशी ठरला. 

 

 

Web Title: Allu Arjun's Pushpa 2 Failing To Break The Record Of Kgf Chapter 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.