अल्लू अर्जून ते 'पुष्पराज' असा तयार झाला लूक, पाहा हा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 18:46 IST2025-01-03T18:45:57+5:302025-01-03T18:46:18+5:30

 'पुष्पा २' च्या सेटवरून अल्लू अर्जुनच्या मेकओव्हरचा BTS व्हिडीओ व्हायरल होत आहे

Allu Arjun To Pushparaj Makeover For Pushpa 2 Watch BTS Video | अल्लू अर्जून ते 'पुष्पराज' असा तयार झाला लूक, पाहा हा Video

अल्लू अर्जून ते 'पुष्पराज' असा तयार झाला लूक, पाहा हा Video

Allu Arjun Pushpa 2 Makeover: सुपरस्टार अल्लू अर्जूनचा 'पुष्पा २' ची चर्चा सध्या सगळीकडे आहे.  ५ डिसेंबरला थिएटरमध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा २'च्या कमाईचं वादळ अजूनही चांगलंच घोंघावत आहे. भारतीय मनोरंजन विश्वातील सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा म्हणून 'पुष्पा २'ला ओळखलं जातंय. 'पुष्पा २'मधील गाणी, डॉयलॉग आणि अल्लू अर्जूनचा लूक हे सर्वंच चाहत्यांच्या पसंतीस पडलं आहे. आता अशातच एक व्हिडीओ समोर आलाय, ज्यामध्ये अल्लू अर्जून ते 'पुष्पराज' बनतानाचा मेकओव्हर पाहायला मिळतोय.

 'पुष्पा २' च्या सेटवरून अल्लू अर्जुनच्या मेकओव्हरचा BTS व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात व्हॅनिटी व्हॅनमध्ये मेकअप आर्टिस्ट हे अल्लू अर्जूनला 'पुष्पराज'चा लूक देताना दिसत आहेत.  अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओवरून 'पुष्पराज'चा लूक तयार करण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली असेल, याचा अंदाज येतो. या BTS व्हिडीओमध्ये चित्रपटाचा दिग्दर्शक सुकुमार हे अल्लू अर्जुनला सीन समजावून सांगताना पाहायला मिळत आहेत.  

'पुष्पराज' या भूमिकेसाठी अल्लू अर्जूनने खूप मेहनत घेतली. याच मेहनतीचं फळ त्याला मिळालं असून सिनेमानं मोठ यश मिळवलं आहे.  'पुष्पा २'ने आतापर्यंत १७९९ कोटींहून अधिक कमाई केली आहे.२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा' सिनेमाचा हा सीक्वल आहे. 'पुष्पा २'नंतर आता 'पुष्पा ३'ची देखील घोषणा करण्यात आली आहे. आता या सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Web Title: Allu Arjun To Pushparaj Makeover For Pushpa 2 Watch BTS Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.