खूपच फिल्मी आहे साऊथ स्टार अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी, अशी झालेली सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 12:37 PM2024-04-08T12:37:35+5:302024-04-08T12:38:30+5:30

अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी

Allu Arjun Birthday Know His filmy Love Story With Sneha Reddy | खूपच फिल्मी आहे साऊथ स्टार अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी, अशी झालेली सुरुवात

खूपच फिल्मी आहे साऊथ स्टार अल्लू अर्जून आणि आणि स्नेहाची लव्हस्टोरी, अशी झालेली सुरुवात

अभिनेता अल्लू अर्जुन म्हणजे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार. अल्लू अर्जुन फक्त भारतात स्टार राहिलेला नाही तर ग्लोबल स्टार बनलाय.  अल्लू अर्जून त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. आज तो आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अल्लू अर्जुनने आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आणि नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकून घेतली. अल्लू अर्जुनचे त्याची पत्नी स्नेहावर किती प्रेम आहे, हे तो बरेचदा शेअर करत असलेल्या फोटो आणि व्हिडीओंवरून स्पष्टपणे दिसून येते. त्यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे भन्नाट आहे.

एका मित्राच्या लग्नात अल्लू आणि स्नेहा यांची पहिल्यांदा ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची छान मैत्रीही झाली. पहिल्याच भेटीते ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केले. अल्लू अर्जुन हे नाव तिच्यासाठी नवीन नव्हतं. तो अभिनेता असल्याचं तिला माहिती होतं. पण त्याचे सिनेमे तिनं पाहिले नव्हते. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या लग्नाला सेन्हाच्या वडिलांनी विरोध दर्शवला. 

स्नेहा ही हैदराबादच्या एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे. जेव्हा अल्लू अर्जूनचे वडील हे लग्नाचा प्रस्ताव घेऊन  स्नेहाच्या घरी गेले आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलले.  तेव्हा मात्र स्नेहाच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. पण अल्लु आणि स्नेहा एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांनी घरातल्यांची समजूत काढली. अखेर स्नेहाच्या हट्टाखातर आणि अल्लू अर्जुनच्या विनंतीनंतर तिच्या कुटुंबीयांनी लग्नास होकार दिला. यानंतर ६ मार्च २०११ रोजी दोघांनी थाटामाटात लग्न केलं.

अल्लू आणि स्नेहा आज त्यांच्या संसारात अत्यंत सुखी असून त्यांना आर्यन आणि अरहा अशी दोन मुलं आहेत. अल्लू हा प्रसिद्ध तेलगू दिग्दर्शक अल्लू अरविंद यांचा मुलगा आहे आणि प्रसिद्ध अभिनेते चिरंजीवी यांचा भाचा आहे. तो गोल्बल स्टार असला तरी याचा त्यानं कधीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होऊ दिला नाही. त्याचे स्नेहावर खूप प्रेम आहे. जगभरातील तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या अल्लू अर्जूनवर फक्त स्नेहाचं राज्य आहे.

Web Title: Allu Arjun Birthday Know His filmy Love Story With Sneha Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.