पुन्हा दिसला अल्लू अर्जुनचा 'स्वॅग', ढोलताशाच्या गजरात मुंबईत 'पुष्पा' अन् 'श्रीवल्ली'चं स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:19 IST2024-11-29T14:18:44+5:302024-11-29T14:19:22+5:30
अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत.

पुन्हा दिसला अल्लू अर्जुनचा 'स्वॅग', ढोलताशाच्या गजरात मुंबईत 'पुष्पा' अन् 'श्रीवल्ली'चं स्वागत
सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' रिलीज होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. नुकतंच अल्लू अर्जुन आणि रश्मिका 'पुष्पा 2' च्या प्रमोशनसाठी मुंबईत पोहोचले. यावेळी दोघांचेही मोठ्या थाटामाटात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचे मुंबई विमानतळावरील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. दोघांना पाहातच चाहत्यांनी गर्दी केल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. यावेळी चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. अल्लू अर्जूनने परिधान केलेल्या हुडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. "फ्लावर नहीं फायर है मैं" हा डायलॉग प्रिटेंड असलेली पांढऱ्या रंगाची हुडी त्याने परिधान केली होती.
दरम्यान, 'पुष्पा 2' प्रदर्शित होण्यासाठी आता फक्त 7 दिवस उरले आहेत. येत्या 5 डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. सुकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'पुष्पा 2'ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सिनेमाचं ॲडव्हान्स बुकिंग हे 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाचं बजेट जवळपास 400 कोटी रुपये आहे. निर्मात्यांना आशा आहे की बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 1000 कोटींचा आकडा पार करेल.