श्रीरामनंतर आता प्रभास 'भगवान शिव' च्या भूमिकेत; क्रिती सेननच्या बहिणीसोबत स्क्रीन शेअर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 05:13 PM2023-09-10T17:13:26+5:302023-09-10T17:15:16+5:30

‘आदिपुरुष’ चित्रपटात श्री रामची भूमिका साकारल्यानंतर प्रभास आता 'भगवान शिव'च्या अवतारात दिसणार आहे. 

After Ram, Prabhas set to portray Lord Shiva in Vishnu Manchu's movie 'Kannappa' | श्रीरामनंतर आता प्रभास 'भगवान शिव' च्या भूमिकेत; क्रिती सेननच्या बहिणीसोबत स्क्रीन शेअर करणार

Prabhas

googlenewsNext

सुपरस्टार 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास गेल्या अनेक दिवसांपासून आगामी 'सालार' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.  यातच अभिनेता प्रभासच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटात श्री रामची भूमिका साकारल्यानंतर प्रभास आता 'भगवान शिव'च्या अवतारात दिसणार आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, 'भक्त कनप्पा' नावाचा हा तेलुगु चित्रपट असणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या क्रिती सेननची बहीण नुपूर सेनन या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.  हा चित्रपट विष्णू मंचू यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. ज्यामध्ये प्रभास महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. विष्णू मंचू यांनी यासंबंधी एक ट्विट केले आहे.  

'भक्त कनप्पा' हा बिग बजेट चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश कुमार सिंग करणार आहेत.  चित्रपटाचे शूटिंग भारतात नसून न्यूझीलंडमध्ये होणार आहे. न्यूझीलंडमध्ये चित्रपटासाठी मोठे आणि आलिशान सेट उभारले जात आहेत.


प्रभासच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचे झाले तर,  प्रभासचा 'सालार' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, जो तामिळ, कन्नड व्यतिरिक्त हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.

तर प्रभास सालारशिवाय 'प्रोजेक्ट के' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या चित्रपटात तो दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन हेदेखील पाहायला मिळणार आहेत. बाहुबली'नंतर प्रभास चमकदार कामगिरी करू शकलेला नाही. त्याच्या बहुप्रतिक्षित 'आदिपुरुष' चित्रपटानेही चाहत्यांची निराशा केली. आता त्याच्या आगामी चित्रपटाकडून चाहत्यांना मोठी आशा आहे.

Web Title: After Ram, Prabhas set to portray Lord Shiva in Vishnu Manchu's movie 'Kannappa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.