"आता माझं आयुष्य निरर्थक..." ख्रिसमसच्या दिवशी त्रिशा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:31 IST2024-12-26T15:30:16+5:302024-12-26T15:31:34+5:30

ख्रिसमसच्या दिवशीच त्रिशावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

Actress Trisha Krishnan Son Zorro Passes Away Announces Break From Work | "आता माझं आयुष्य निरर्थक..." ख्रिसमसच्या दिवशी त्रिशा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर

"आता माझं आयुष्य निरर्थक..." ख्रिसमसच्या दिवशी त्रिशा कृष्णनवर कोसळला दु:खाचा डोंगर

Trisha Krishnan : अभिनेत्री त्रिशा ही यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. त्रिशाने अनेक हिट सिनेमे केले आहेत. तिने सर्वच दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे. आजही अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते. अशातच अभिनेत्रीनं भावूक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ख्रिसमसच्या दिवशीच त्रिशावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

त्रिशानं तिच्या प्रिय कुत्र्याला गमावलं आहे. तिचा पाळीव कुत्रा झॉरो याचं निधन झालं आहे. त्रिशाचं तिच्या पाळीव कुत्र्यावर प्रचंड प्रेम होतं. अगदी मुलाप्रमाणे तिनं त्याला वाढवलं होतं. त्रिशानं झॉरोच्या दफनभूमीचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, "माझा मुलगा झॉरो याने ख्रिसमसच्या दिवशी सकाळी जगाचा निरोप घेतला. मला जवळून ओळखणारे लोक समजू शकतात की, आता माझं आयुष्य निरर्थक झालं आहे. या धक्क्यातून मी आणि माझे कुटुंब सावरलेलो नाही. मी काही काळ कामातून ब्रेक घेत आहे". 


त्रिशा कृष्णन ४१ वर्षांची आहे. मात्र ती अद्याप अविवाहित आहे. त्रिशाचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत राहिलं आहे. तिचा साखरपुडा झाला होता. मात्र लग्नाआधीच तो साखरपुडा मोडला. जानेवारी 2015 मध्ये तिचा चेन्नईमधील बिझनेसमन वरुणशी साखरपुडा झाला होता. मात्र, काही महिन्यांतच हा साखरपुडा मोडला. तृषाने चित्रपटांमध्ये काम केलेलं वरुणला पसंत नव्हतं, असं यामागचं कारण म्हटलं जात होतं.  त्रिशा नुकतीच 'पोन्नियन सेल्व्हन2', 'लिओ' सिनेमात दिसली. साऊथ इंडस्ट्रीत ती आजही सुपरहिट सिनेमे देत आहे.

Web Title: Actress Trisha Krishnan Son Zorro Passes Away Announces Break From Work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.