६३ व्या वर्षीही बॉक्स ऑफिस गाजवतेय 'ही' अभिनेत्री! फक्त १० दिवसांत सिनेमाने कमावले इतके कोटी, तुम्ही बघितला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 15:50 IST2026-03-10T15:41:13+5:302026-03-10T15:50:11+5:30

अमिताभ-ऋषी कपूर यांची हिरोईन! ६३ वर्षीय नायिकेने केली सगळ्यांची बत्तीगुल, सिनेमाची होतेय चर्चा

actress radhika sarathkumar starrer film thai kizhavi earn more than 50 crores at the worldwide in box office just 10 days | ६३ व्या वर्षीही बॉक्स ऑफिस गाजवतेय 'ही' अभिनेत्री! फक्त १० दिवसांत सिनेमाने कमावले इतके कोटी, तुम्ही बघितला?

६३ व्या वर्षीही बॉक्स ऑफिस गाजवतेय 'ही' अभिनेत्री! फक्त १० दिवसांत सिनेमाने कमावले इतके कोटी, तुम्ही बघितला?

South Movie: दरवर्षी भारतात असंख्य चित्रपट प्रदर्शित होत असतात.मात्र, दाक्षिणात्य चित्रपटांची प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते.या चित्रपटांच्या कथा, मांडणी आणि कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकण्याची कोणतीच कसर सोडत नाहीत. रोमँटिक, कॉमेडी, थ्रिलर, हॉरर सर्व प्रकारचे चित्रपट दाक्षिणात्य इंडस्ट्रीत बनतात आणि प्रेक्षकही या कलाकृतींनी भरभरून प्रतिसाद देतात.अशाच एका चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा रंगली आहे. हा दाक्षिणात्य  चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करतोय.कमी बजेट आणि कोणताही मोठा कलाकार नसूनही बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा बाजी मारण्यात यशस्वी ठरला आहे.

दरम्यान, या बहुचर्चित चित्रपटाचं नाव थाई किझावी. हा एक तमिळ चित्रपट आहे. अतिशय कमी बजेटमध्ये बनवलेल्या या विनोदी चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.शिवकुमार मुरुगेसन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला थाई किझावी हा एक विनोदी चित्रपट आहे. या चित्रपटात कोणतेही प्रसिद्ध चेहरे नसून एका ६३ वर्षीय अभिनेत्री हा संपूर्ण सिनेमा आपल्या खांद्यावर पेलला आहे. 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांची चित्रपटात मु्ख्य भूमिका आहे. या चित्रपटात राधिका यांनी एका ७० वर्षांच्या वृद्ध महिलेची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांची मने जिंकत आहे. राधिका व्यतिरिक्त, या चित्रपटात सिंगमपुली, अरुलदोस आणि बाला सरवनन यांच्याही भूमिका आहेत.अवघ्या ९ कोटींच्या बजेटमध्ये  बनवलेल्या या चित्रपटाने रिलीजच्या फक्त १० दिवसांतच जगभरात ५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. SACNILC च्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने फक्त ११ दिवसांत जगभरात ५४ कोटी रुपये इतका व्यवसाय केला आहे.या 
चित्रपटाला IMDb वर ८.२ रेटिंग मिळालं आहे.

कोण आहे ही अभिनेत्री?

१९७९ साली आलेल्या चित्रपटातून राधिका सरथकुमार यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. राधिका सरथकुमारने 'नसीब अपना अपना'शिवाय 'पराया', 'अस्ली नक्की', 'आज का अर्जुन', 'लाल बादशाह', 'जीन्स', 'रंगा', 'मारी',या सिनेमांमध्ये काम केलं आहे. नशीब अपना अपना या चित्रपटात राधिकाने ऋषी कपूर यांच्या पत्नी चंदाची भूमिका साकारली होती.शेवटच्या त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत लाल बादशाह चित्रपटात पाहायला मिळाल्या.

Web Title : 63 वर्षीय अभिनेत्री की फिल्म 'थाई किझावा' बॉक्स ऑफिस पर हिट!

Web Summary : राधिका सरथकुमार की तमिल फिल्म 'थाई किझावा', जो कम बजट में बनी है, बॉक्स ऑफिस पर सफल रही है। फिल्म ने सिर्फ 10 दिनों में दुनिया भर में ₹50 करोड़ कमाए। राधिका फिल्म में 70 साल की एक महिला का किरदार निभा रही हैं।

Web Title : 63-Year-Old Actress's Movie 'Thai Kizhava' Box Office Hit!

Web Summary : Radhika Sarathkumar's Tamil film 'Thai Kizhava', made on a small budget, is a box office success. The film earned ₹50 crore worldwide in just 10 days. Radhika plays a 70-year-old woman in the movie.