अरुंधतीच्या कुटुंबियांनी मागितली चाहत्यांकडे मदत; व्हेंटिलेटरवर असलेल्या अभिनेत्रीच्या उपचारासाठी नाहीत पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 13:40 IST2024-03-20T13:35:01+5:302024-03-20T13:40:12+5:30
व्हेंटिलेटरवर असलेल्या अरुंधती नायरसाठी कुटुंबाने मागितली मदत, पण लोकांनी विचित्र प्रतिसाद दिल्याने कुटुंब नाराज! नेमकं काय घडलं?

अरुंधतीच्या कुटुंबियांनी मागितली चाहत्यांकडे मदत; व्हेंटिलेटरवर असलेल्या अभिनेत्रीच्या उपचारासाठी नाहीत पैसे
साऊथ मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधती नायर हिचा अपघात झाला असून ती व्हेंटिलेटरवर असल्याची बातमी १८ मार्चला सर्वांसमोर आली. अरुंधती केवळ २८ वर्षांची आहे. अरुंधतीची प्रकृती सध्या नाजूक असून तिच्या कुटुंबियांनी मदतीची याचना केली आहे. पण लोकांनी आर्थिक आवाहनाला विचित्र प्रतिसाद दिल्याने कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केलीय. काय घडलंय नेमकं?
अरुंधती नायरचं कुटुंब सध्या आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. अरुंधतीच्या उपचारांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे कलाकार अथवा तामिळ इंडस्ट्रीमधून मदत मिळण्याची कुटुंबियांना अपेक्षा होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळू शकला नाही. त्यामुळे त्यांनी लोकांकडे मदतीचं आवाहन केलं. परंतु लोकांनी विचित्र प्रतिसाद देऊन या कँपेनला ट्रोल केलंय.
अरुंधतीच्या उपचारांसाठी ५ लाखांची आवश्यकता आहे. अरुंधतीची ब्रेन सर्जरीही होणार आहे. त्यामुळे अरुंधतीच्या मदतीसाठी तिच्या मित्रांनी G PAY नंबर शेअर करत लोकांना मदतीचं आवाहन केलं. परंतु या नंबरवर मदत पाठवण्याऐवजी लोकं विविध प्रश्न विचारत आहेत. याशिवाय विविध सेलिब्रिटींच्या नंबरची मागणी करत आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव अरुंधतीच्या मित्रांनी आणि तिच्या कुटुंबियांनी हे कँपेन बंद केलंय. अरुंधती लवकरात लवकर बरी व्हावी याची तिच्या कुटुंबियांना अन् चाहत्यांना अपेक्षा आहे.