अभिनेता यशच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना अपघात; तीन चाहत्यांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 01:35 PM2024-01-08T13:35:48+5:302024-01-08T13:37:49+5:30

Actor Yash Birthday News: KGF चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता यशचा आज 38वा वाढदिवस आहे.

Actor Yash Birthday News: Accident while putting up the birthday banner of actor Yash; Three fans died on the spot and three were injured | अभिनेता यशच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना अपघात; तीन चाहत्यांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी

अभिनेता यशच्या वाढदिवसाचे बॅनर लावताना अपघात; तीन चाहत्यांचा जागीच मृत्यू तर तिघे जखमी

Actor Yash Birthday and Accident: कन्नड अभिनेता यशचा आज 38वा वाढदिवस आहे. पण, यशच्या वाढदिवसाच्या आदल्या रात्री कर्नाटकातील गदग जिल्ह्यात मोठा अपघात झाला. विजेच्या खांबावर यशचे मोठे बॅनर लावत असताना तीन जणांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे गंभीर जखमी झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी (7 जानेवारी) रात्री उशिरा घडली. यशच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते विजेच्या खांबाजवळ एक मोठे बॅनर लावत होते. यावेळी त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. शॉक इतका जोरदार होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

KGF मुळे जगभरात यशचे नाव
यशचे खरे नाव नवीन कुमार गौवाडा आहे, पण तो चित्रपटसृष्टीत यश नावाने ओळखला जातो. यशने कन्नड चित्रपटसृष्टीत 2007 मध्ये आलेल्या 'जंबडा हुडुगी' मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्याने 'रॉकी' (2008), 'गुगली' (2013) आणि 'मिस्टर अँड मिसेस रामाचारी' (2014) सारखे हिट चित्रपट दिले. पण, KGF चित्रपटाने यशला देश-विदेशात ओळख मिळवून दिली. 

'टॉक्सिक' पुढील वर्षी रिलीज होणार
यशच्या आगामी चित्रपटांपैकी 'टॉक्सिक'ची सर्वाधिक चर्चा होत आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. केव्हीएन प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतू मोहनदास करत आहे. या चित्रपटात यश आणि श्रुती हसन मुख्य भूमिकेत असणार आहेत. 

Web Title: Actor Yash Birthday News: Accident while putting up the birthday banner of actor Yash; Three fans died on the spot and three were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.