तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:51 IST2024-02-21T16:49:30+5:302024-02-21T16:51:17+5:30
विजय देवराकोंडा आणि त्याच्या फॅन्समधील भन्नाट संभाषण सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालंय. तुम्हीही वाचा

तू रिप्लाय दिला तरच...! २ मुलींचा सोशल मीडियावर अजब प्रस्ताव, विजय म्हणाला...
आपल्या लाडक्या कलाकाराची एकदा भेट व्हावी म्हणून चाहते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. कलाकार सुद्धा फॅन्सना अचानक संपर्क साधून त्यांना सरप्राईज देत असतात. साऊथ सुपरस्टार विजय देवराकोंडाचंही (Vijay Deverakonda) फॅन फॉलोईंग प्रचंड आहे. अशातच विजयजवळ दोन लहान मुलींनी अजब प्रस्ताव मांडला. त्यावर विजयनेही त्यांना भन्नाट रिप्लाय दिलाय.
झालं असं की.. १५ फेब्रुवारीला हर्षिता रेड्डी या इन्स्टाग्राम युजरने तिच्या मैत्रीणीसोबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओखाली तिने विजय देवराकोंडाला टॅग करत लिहीलं, "जर विजय देवराकोंडाने या व्हिडीओवर कमेंट केली तरच आम्ही परिक्षेच्या तयारीला सुरुवात करु," आता विजय या दोघींच्या व्हिडीओवर कमेंट करणार का? याची सर्वांना उत्सुकता होती. आणि सरप्राईज म्हणजे.. विजयने व्हिडीओखाली भन्नाट कमेंट करत रिप्लाय दिला.
व्हिडीओ पोस्ट झाल्यावर तीन दिवसांनी म्हणजेच १८ फेब्रुवारीला विजयने या मुलींच्या व्हिडीओखाली कमेंट करत लिहीलं, "परिक्षेत ९० % मिळवा. मी भेटेन तुम्हाला." अशी पोस्ट करत विजयने या मुलींना भेटण्याचं आश्वासन दिलं. विजयने केलेल्या या कृतीचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय. विजयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर.. तो काही दिवसांपुर्वी समंथासोबत 'खुशी'' सिनेमात झळकला होता.