आधी बिष्णोई गँगकडून मिळाली धमकी, आता नव्या घरात शिफ्ट झाला अभिनेता, आईच्या हस्ते केली पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 15:45 IST2026-01-02T15:38:06+5:302026-01-02T15:45:24+5:30
आधी जीवे मारण्याची धमकी मिळाली आता अभिनेता थेट नवीन घरात शिफ्ट झाला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

आधी बिष्णोई गँगकडून मिळाली धमकी, आता नव्या घरात शिफ्ट झाला अभिनेता, आईच्या हस्ते केली पूजा
गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँगकडून टोळीकडून मिळालेल्या धमक्यांमुळे चर्चेत असलेल्या पवन सिंहने नवीन वर्षाच्या मुहूर्तावर लखनऊमध्ये आपल्या नव्या आलिशान घरात गृहप्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, त्याने आपल्या आईच्या हस्ते पूजा करून या नवीन घरात प्रवेश केला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून घ्या सविस्तर
मिळालेल्या माहितीनुसार, पवन सिंहने लखनऊमधील 'सुशांत गोल्फ सिटी' या उच्चभ्रू भागात एक फ्लॅट खरेदी केला आहे. गृहप्रवेशापूर्वी त्याने एका मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आईचा आशीर्वाद घेऊन नव्या घरात पाऊल ठेवले. काही दिवसांपूर्वीच पवन सिंहला एका अज्ञात नंबरवरून फोन आला होता, ज्यात त्याला सलमान खानसोबत बिग बॉसच्या मंचावर जाऊ नको, अशी धमकी मिळाली. या पार्श्वभूमीवर सध्या पवनच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे.
पवन सिंह नए साल में अपने परिवार के साथ बिहार से लखनऊ शिफ्ट हो गए हैं। नए साल पर मां के साथ मंदिर में पूजा अर्चना किए। pic.twitter.com/HgvPoTR1wq
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) January 2, 2026
पवन सिंहच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्याकडे आधीच मुंबईत चार फ्लॅट आहेत. याशिवाय बिहारमधील पाटणा आणि त्याच्या मूळ गावी आरा येथेही त्याची मोठी मालमत्ता आहे. पवन सिंहची एकूण संपत्ती १६.७५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. एकीकडे धमक्यांचं सावट असताना पवन सिंहने आपल्या आईसोबत आनंदाने नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. त्याच्या या नव्या घराच्या प्रवेशाबद्दल भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.