प्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, काही तासातच केली पत्नीच्या प्रेग्नंसीची पोस्ट; होतोय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 15:31 IST2025-07-28T15:25:52+5:302025-07-28T15:31:05+5:30
अभिनेत्यावर आता अनेक मीम्सही बनत आहेत

प्रसिद्ध अभिनेत्याने केलं दुसरं लग्न, काही तासातच केली पत्नीच्या प्रेग्नंसीची पोस्ट; होतोय ट्रोल
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता माधमपट्टी रंगराज (Madhampatty Rangaraj) सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. कालच त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्न झाल्याचं जाहीर केलं. हे त्याचं दुसरं लग्न आहे. सेलिब्रिटी स्टायलिस्ट जॉय क्रिजिल्दासोबत त्याने लग्नगाठ बांधली. आश्चर्य म्हणजे लग्नाची पोस्ट केल्यानंतर काहीच तासात त्याने पत्नी प्रेग्नंट असल्याचीही गुडन्यूज शेअर केली. यामुळे अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
माधमपट्टी रंगराज आणि त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर आधी लग्नाचा फोटो शेअर केला. गुलाबी रंगाच्या पारंपरिक पेहरावात माधमपट्टी दिसत आहे. तर जॉय लाल रंगाच्या साडीत दिसत आहे. माधमपट्टी बायकोच्या भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. 'मिस्टर अँड मिसेस रंगराज' असं कॅप्शन जॉयने लिहिलं आहे.
या फोटोनंतर काहीत मिनिटात त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला. यामध्ये दोघांच्या गळ्यात हार आहे. हसत कॅमेऱ्यासमोर पोज देत दोघं उभे आहे. या फोटोच्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं. जॉयने लिहिले,'बेबी लोडिंग २०२५..आम्ही प्रेग्नंट आहोत. सहा महिने पूर्ण'. असं कॅप्शन आहे.
माधमपट्टी रंगराजच्या या पोस्टवरुन अनेकजण त्याला ट्रोल करत आहेत. 'फारच लवकर अशी मजेशीर कमेंट एकाने केली आहे. 'घटस्फोट होईपर्यंत तरी थांबायचं' अशीही एकाची कमेंट आहे. त्याची पहिली पत्नी श्रुती रंगराज आहे जिच्यासोबत अजून त्याचा घटस्फोट फायनल झालेला नाही. त्यांना दोन मुलं आहेत.
माधमपट्टी रंगराजने 'मेहंदी सर्कस', 'पेंग्विन' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच तो शेफही आहे. बंगळुरुत त्याचे काही रेस्टॉरंट्स आहेत. मोठमोठ्या लग्नासाठी तो केटरिंगचे ऑर्डर घेतो. अनेक कुकिंग शोमध्ये तो परीक्षकाच्या भूमिकेत दिसला आहे.