मामाच्या मुलीसोबत केलं लग्न! दोनवेळा घटस्फोट झाल्यावर सुप्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:50 IST2024-10-25T18:48:12+5:302024-10-25T18:50:38+5:30

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला असून त्याने मामाच्या मुलीशीच लग्न केल्याचं समजतंय (bala)

Actor Bala marries his relative Kokila tying the knot for the fourth time | मामाच्या मुलीसोबत केलं लग्न! दोनवेळा घटस्फोट झाल्यावर सुप्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर

मामाच्या मुलीसोबत केलं लग्न! दोनवेळा घटस्फोट झाल्यावर सुप्रसिद्ध अभिनेता तिसऱ्यांदा चढला बोहल्यावर

सुप्रसिद्ध अभिनेता बालाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलंय. सध्या बाला त्याच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल आयुष्यासंबंधी जास्त चर्चेत आहे. नुकतीच बातमी अशी येतेय की, बाला तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला आहे. इतकंच नव्हे तर मामाच्या मुलीशीच बालाने लग्न केलंय. बुधवारी सकाळी ८.३० वाजता एर्नाकुलम येथील पावकुलम मंदिरात बालाने तिसऱ्यांदा लग्न केलंय. मामाची मुलगी कोकिलासोबत बालाने लग्नगाठ बांधली आहे.

बालाच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा

बालाने लग्न झाल्यावर मीडियाशी बोलताना याविषयी खुलासा केला. बालाच्या या लग्नाला त्याच्या कुटुंबातले सदस्य आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. मामाची मुलगी कोकिलाने कठीण काळात मला भक्कम सपोर्ट केलाय, असा खुलासा बालाने केलाय.  बाला म्हणाला की, "कोकिला माझी नातेवाईक आहे. मला खंत आहे की माझी आई या क्षणी नाही. आई ७४ वर्षांची असून तिची तब्येत खराब असल्याने ती येऊ शकली नाही. कोकिलाने वाईट काळात माझी खूप मदत केलीय."

बालाच्या वैवाहिक जीवनाविषयी

बालाचं पहिलं लग्न गायिका अमृता सुरेशसोबत झालं होतं. परंतु काही मतभेद झाल्याने दोघांचा घटस्फोट झाला झाला. घटस्फोटानंतर एलिझाबेथ उदयनसोबत बालाने दुसरं लग्न केलं. बालाचं दुसरं लग्न रजिस्टर नाही. परंतु आता बालाने मामाच्या मुलीशी तिसरं लग्न केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. बालाने या लग्नाविषयी प्रांजळपणे खुलासा केलाय. बालाशी लग्न करण्याची मामाची मुलगी कोकिलाची लहानपणापासूनची इच्छा होती, असं अभिनेता म्हणाला. 

Web Title: Actor Bala marries his relative Kokila tying the knot for the fourth time