सोनम कपूरने केले बेसनाचे लाडू; क्षणार्धात Video झाला व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 16:30 IST2021-11-05T16:30:00+5:302021-11-05T16:30:00+5:30
Sonam Kapoor: अलिकडेच सोनमने दिवाळीचं निमित्त साधत चाहत्यांना एका खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती चक्क लाडू करताना दिसत आहे.

सोनम कपूरने केले बेसनाचे लाडू; क्षणार्धात Video झाला व्हायरल
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर( anil kapoor) याचाी लेक सोनम कपूर (Sonam Kapoor) सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. कलाविश्वात लोकप्रिय मिळवणारी ही अभिनेत्री सध्या पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहत आहे. परंतु, इतक्या लांब असूनही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत आहे. अलिकडेच सोनमने दिवाळीचं निमित्त साधत चाहत्यांना एका खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या. सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती चक्क लाडू करताना दिसत आहे.
दिवाळीचं निमित्त साधत सोनमने बेसनाचे लाडू करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ मध्ये ती सुंदररित्या लाडू तयार करत आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणेच सोनमदेखील दिवाळीचा फराळ करत असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून येत आहे.
दिव्याच्या रोषणाईने अंध:कार दूर व्हावा आणि आनंदाचा उजेड पडावा, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा, असं कॅप्शन सोनमने या व्हिडीओला दिलं आहे.
दरम्यान, सोनम बॉलिवूडची फॅशनिस्टा या नावाने ओळखली जाते. कोणतीही नवीन फॅशन ती बिंधास्तपणे कॅरी करत असते. सोनमने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सावरियाँ या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली होती. त्यानंत 'द जोया फॅक्टर' , 'आय हेट लव स्टोरी', 'रांझणा', दिल्ली-6, नीरजा या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.