सोनाक्षी सिन्हाच्या या ट्रान्सपरंट ड्रेसवर युजर्सची टीका, काय म्हणाले युजर्स?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 18:31 IST2018-04-13T17:07:55+5:302018-04-13T18:31:09+5:30
हा फोटो शेअर करत सोनाक्षीने त्यावर 'असली सोना' असं कॅप्शन दिलंय. मात्र, सोनाक्षीचा हा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना आवडलेला दिसत नाहीये.

सोनाक्षी सिन्हाच्या या ट्रान्सपरंट ड्रेसवर युजर्सची टीका, काय म्हणाले युजर्स?
मुंबई: बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम एक फोटो शेअर केला होता. यात तिने लाल रंगाचा ट्रान्सपरंट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमुळे सोनाक्षीला ट्रोल करण्यात आलं.
हा फोटो शेअर करत सोनाक्षीने त्यावर 'असली सोना' असं कॅप्शन दिलंय. मात्र, सोनाक्षीचा हा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना आवडलेला दिसत नाहीये. अनेकांनी या फोटोवर वाईट कमेंट लिहिल्या आहेत. काही वाईट कमेंट आल्या असल्यातरी काहींनी या फोटोला चांगलंही म्हटलं आहे.
याआधीही सोनाक्षी सिन्हाने एका इव्हेंटमध्ये डिझायनर मनिष मल्होत्राने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. सोनेरी रंगाच्या त्या ड्रेसमध्येही सोनाक्षी हॉट दिसत होती. या ड्रेसवरही काहींनी वाईट कमेंट केल्या होत्या.
सोनाक्षी सध्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सोनाक्षी रेस 3 या सिनेमात एक आयटम डान्स करणार आहे. याआधीही सोनाक्षीने काही सिनेमांमध्ये आयटम डान्स करुन चाहत्यांकडून वाह वाह मिळवली आहे.