लग्नानंतर कुठे राहणार सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी? 'तो' फोटो शेअर करत केली नवी सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:57 IST2025-12-15T11:57:01+5:302025-12-15T11:57:26+5:30
सोहमने अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण, लग्नानंतर लगेचच सोहम आणि पूजा वेगळे राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे.

लग्नानंतर कुठे राहणार सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी? 'तो' फोटो शेअर करत केली नवी सुरुवात
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल असलेल्या आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सोहमने अभिनेत्री पूजा बिरारी हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पण, लग्नानंतर लगेचच सोहम आणि पूजा वेगळे राहणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याला कारणही तसंच आहे.
सोहम आणि पूजा यांचा एक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये पूजाच्या हातात घराची चावी दिसत आहे. सोहम आणि पूजाने हे घर नव्याने घेतलेलं नाही. तर इथे ते भाड्याने राहणार आहेत. शूटिंग लोकेशन जवळ असल्यामुळे त्या दोघांनी या घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. चाहते, सेलिब्रिटी आणि घरातील नातेवाईकांनीही पूजा आणि सोहमच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

सोहम आणि पूजाने २ डिसेंबर रोजी लग्नाच्या बेडीत अडकत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्वाभिमान, येड लागलं प्रेमाचं या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तर सोहम निर्मिती कंपनी सांभाळत आहे.