'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 21:23 IST2026-01-11T21:21:54+5:302026-01-11T21:23:16+5:30
बिग बॉस मराठी ६ मध्ये करण सोनावणेची एन्ट्री झाली आहे. करण हा प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आहे

'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
'बिग बॉस मराठी ६' ला सुरुवात झाली आहे. रितेश देशमुख पुन्हा एकदा 'बिग बॉस मराठी ६'चं सूत्रसंचालन करत आहे. 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात कोण येणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशातच ग्रँड प्रिमिअरमध्ये रितेश देशमुख प्रत्येक स्पर्धकाचं स्वागत करत आहे. 'बिग बॉस मराठी ६'मध्ये करण सोनावणेची दिमाखात एन्ट्री झाली आहे. करण हा रिल स्टार आणि सोशल मीडियावरचं मोठं नाव आहे.
फोकस इंडियन या नावाने करण सोनावणे इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे. करणचं सोनावणे वहिनीच्या लूकमधील रिलही चांगलंच व्हायरल झालं आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेला करण गेल्या काही वर्षात स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. करणचे अनेक रिल चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत. करणने भारताचे क्रिकेट सामने आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघातील क्रिकेटपटूंसह रिल केले आहेत.
करण सोनावणे आता 'बिग बॉस मराठी ६'मध्ये त्याच्या खेळाने प्रेक्षकांचं मन कसं जिंकणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. करण सोनावणेने दिमाखात 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात एन्ट्री घेतली. खऱ्या आयुष्यात करणच्या उत्कृष्ट विनोदबुद्धीचा अनुभव त्याच्या चाहत्यांना आला आहे. त्यामुळे करण 'बिग बॉस मराठी ६'च्या घरातही इतर स्पर्धकांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करणार का, याची सर्वांना उत्सुकता आहे. आगामी दिवसात करण टास्कमध्ये कसा खेळतो, याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.