लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:24 IST2025-11-26T14:22:24+5:302025-11-26T14:24:56+5:30
पलाश मुच्छलसोबत लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत

लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
गेल्या अनेक दिवसांपासून स्मृती मंधानाच्या लग्नाची चर्चा सुरु होती. पण अशातच स्मृतीच्या वडिलांची तब्येत खालावल्याने लग्न पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर पलाशचीही तब्येत खालावल्याची माहिती समोर आली. अशातच पलाशने स्मृतीला फसवलं असल्याच्या चर्चा समोर आल्याने सर्वांना धक्का बसला. लग्न काही तासांवर असताना अशा चर्चा सुरु झाल्याने स्मृतीच्या चाहत्यांना भुवया उंचावल्या. या सर्व चर्चांदरम्यान स्मृतीने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
स्मृतीने घेतला आणखी एक मोठा निर्णय
वैयक्तिक आयुष्यात आलेल्या या समस्येमुळे स्मृतीने 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) च्या विशेष वर्ल्ड कप एपिसोडच्या शूटिंगमध्ये भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कौटुंबिक आणि भावनिक अडचणींचा सामना करणाऱ्या स्मृती मंधानाने 'कौन बनेगा करोडपती १७' च्या एका विशेष भागातून माघार घेतली आहे. सध्या उलटसुलट चर्चांदरम्यान कुटुंबाची प्रायव्हसी जपण्यासाठी स्मृतीने हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे 'कौन बनेगा करोडपती १७'च्या या विशेष भागात स्मृतीचे चाहते तिला नक्कीच मिस करतील.
स्मृती आणि पलाश यांचा विवाह सोहळा २३ नोव्हेंबर रोजी स्मृतीच्या सांगली येथील घरी होणार होता. लग्नाच्या सर्व विधींना सुरुवात झाली होती, तसेच भारतीय महिला क्रिकेट संघातील अनेक खेळाडू या सोहळ्यासाठी सांगलीत दाखल झाले होते. मात्र, विवाह समारंभाच्या दिवशी, स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकारासारख्या समस्या जाणवू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला, असं सांगण्यात आलं.
पण अशातच स्मृतीचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल तिला चीट करत असून त्याचे एका कोरिओग्राफरसोबतचे चॅट्स व्हायरल झाले. कोरिग्राफरने स्वत:च ते चॅट्स समोर आणले. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.
याशिवाय स्मृतीने तिच्या आणि पलाशच्या साखरपुड्याचे व लग्नाच्या विधींचे सोशल मीडियावर शेअर केलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ तातडीने हटवले आहेत. तिच्या टीममधील खेळाडूंनीही संबंधित पोस्ट काढून टाकल्या आहेत. या सर्व गोंधळात स्मृतीने KBC 17 मध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने चाहत्यांनी तिच्या निर्णयाचा आदर केलाय.