Do Deewane Seher Mein Box Office:: सिद्धांत चतुर्वेदी - मृणाल ठाकूरच्या सिनेमाने दोन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 09:17 IST2026-02-22T09:14:02+5:302026-02-22T09:17:02+5:30
बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या 'दो दीवाने सहर में' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.

Do Deewane Seher Mein Box Office:: सिद्धांत चतुर्वेदी - मृणाल ठाकूरच्या सिनेमाने दोन दिवसांत कमावले फक्त 'इतके' रुपये
बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेल्या 'दो दीवाने सहर में' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली आहे. मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद लाभलेला नाही.
दुसऱ्या दिवशीची कमाई
मिळालेल्या माहितीनुसार, 'दो दीवाने सहर में' चित्रपटाने शनिवारी (दुसऱ्या दिवशी) साधारणपणे १.०८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने १.२५ कोटींचा गल्ला जमवला होता. म्हणजेच विकेंड असूनही चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याऐवजी कमाईचा आकडा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन २.३३ कोटी रुपये झाले आहे.
बॉक्स ऑफिसवर 'अस्सी'शी टक्कर
मृणालच्या या चित्रपटाची स्पर्धा तापसी पन्नूच्या 'अस्सी' या चित्रपटाशी आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या दिवशीच्या कमाईच्या बाबतीत तापसीचा 'अस्सी' (१.१३ कोटी) मृणालच्या चित्रपटापेक्षा पुढे निघून गेला आहे. मात्र, दोन दिवसांच्या एकूण कमाईत 'दो दीवाने सहर में' अजूनही काहीसा पुढे आहे.
'दो दीवाने सहर में' चित्रपटाविषयी
हा चित्रपट मुंबईतील दोन तरुण - रोशनी आणि शशांक यांची कथा दाखवतो. आजच्या काळातील तरुणांच्या मनातील असुरक्षितता, भीती आणि एकमेकांवरील विश्वासाचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे. रवी उदयवार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
चित्रपटाचा विषय चांगला असला तरी त्याची मांडणी कमकुवत असल्याची चर्चा रंगत आहे. सिद्धांत आणि मृणाल यांनी आपल्या अभिनयाने मेहनत घेतली असली तरी स्क्रीप्टमधील उणिवांमुळे चित्रपट प्रेक्षकांना थिएटरपर्यंत खेचण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आता रविवारी सुट्टीच्या दिवशी हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.