"हे सगळं खूप मोलाचं..." व्ही. शांताराम यांची भुमिका साकारण्याबद्दल अभिनेत्यानं व्यक्त केला आनंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 18:04 IST2025-12-04T18:03:51+5:302025-12-04T18:04:10+5:30
चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून व्ही. शांताराम यांची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं आनंद व्यक्त केलाय.

"हे सगळं खूप मोलाचं..." व्ही. शांताराम यांची भुमिका साकारण्याबद्दल अभिनेत्यानं व्यक्त केला आनंद
भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह, प्रसिद्ध चित्रपती व्ही. शांताराम यांचं आयुष्य सिनेमा रुपात मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. व्ही. शांताराम यांच्या बायोपिकची घोषणा झाली असून याचं पहिलं पोस्टरही समोर आलंय. महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित होताच चित्रपटसृष्टीसह सर्व स्तरावरुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद पाहून व्ही. शांताराम यांची भुमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानं आनंद व्यक्त केलाय.
अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील एक गेम चेंजर ठरणार आहे. पोस्टरला मिळालेला प्रतिसाद पाहून तो भारावून गेलाय. सिद्धांतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. ही भूमिका त्याच्यासाठी किती खास आहे, हे त्याने सोशल मीडियावर स्पष्ट केले. तो म्हणाला, "तुम्ही सिनेमा पोस्टरच्या अनाउन्समेंटवर जे इतकं प्रेम आणि सपोर्ट दिलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. हे सगळं खूप खूप मोलाचं आहे. देश घडवणाऱ्या भारतीय सिनेमाच्या बंडखोर काळाची आणि वैभवाची कथा सांगण्यासाठी यापेक्षा चांगला काळच असू शकत नाही".
सिद्धातनं ही भूमिका केवळ अभिनय नाही, तर एक मोठी जबाबदारी असल्याचे त्याने स्पष्ट केले. तो म्हणाला, "माझ्यासाठी तर हे सगळं शब्दांच्या पलीकडचं आहे… फ्रेम्समध्ये शांतपणे स्वप्न पाहणारा एक मुलगा ते आज लेजेंड व्ही. शांताराम यांच्या सावलीत उभे राहण्यापर्यंत... प्रत्येक कलाकार त्या एका कथेची वाट पाहत असतो, जी त्याची सत्यता, त्याचं मन आणि त्याची भूक… सगळंच तपासून पाहते. ही माझ्यासाठी तशीच कथा आहे. हो आता करूया… चित्रपट सुरू" असं त्यानं शेवटी म्हटलं. 'गली बॉय', 'धडक २' या सिनेमांनंतर सिद्धांतचा दमदार अभिनय 'व्ही. शांताराम'च्या निमित्ताने पुन्हा एकदा चाहत्यांना दिसणार आहे.