थंडीच्या दिवसात पूर्ण कपडे घालत जा,शॉर्ट ड्रेसमध्ये श्रुती हसनला पाहून चाहते करतायेत ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 13:00 IST2021-10-28T13:00:28+5:302021-10-28T13:00:39+5:30
श्रुती हसनला पहिल्यांदाच ट्रोल केले जात आहे असे नाही. याआधीही अनेकदा तिला ट्रोल केले गेले आहे.

थंडीच्या दिवसात पूर्ण कपडे घालत जा,शॉर्ट ड्रेसमध्ये श्रुती हसनला पाहून चाहते करतायेत ट्रोल
सेलिब्रेटींसाठी ट्रोल होणे काही नवीन नाही. रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे त्यांच्यावर चर्चा होतच असते. सोशल मीडियावर सेलिब्रेटी सगळ्यात जास्त त्यांच्या ड्रेसिंगमुळेच ट्रोल होताना दिसतात. श्रुती हसन सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट ती चाहत्यांसह शेअर करत असते. व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते. पुन्हा तिने तिचे काही फोटो शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोला तिने कॅप्शनही दिले आहे.
फोटोतला अंदाज तिच्या चाहत्यांना काही रुचला नाही. काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातल्यामुळे चाहत्यांनी पुन्हा तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. काही युजर्स तर तिन काय करायला हवं याविषयी सुद्धा टीप्स देताना दिसत आहेत. तर काहींनी ती सुंदर दिसत असल्याचे सांगत तिची वाहवाही करताना दिसत आहे. दुबईमध्ये तिने हे फोटोशूट केले आहे. थंडीचे दिवस आहेत. स्वतःची काळजी घेत जा, थंडीत पूर्ण कपडे घालत जा अशा कमेंट्स तिच्या या फोटोवर युजर्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
श्रुती हसनला पहिल्यांदाच ट्रोल केले जात आहे असे नाही. याआधीही अनेकदा तिला ट्रोल केले गेले आहे. ट्रोलिंगचा श्रुतीला अजिबात फरक पडत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या ड्रेसिंग स्टाईल करत ती बिनधास्तपणे फोटो शेअर करत चाहत्यांच्या नजरा वेधून घेत असते. फॅशन आणि स्टाईलच्या बाबतीत श्रुती हटके प्रयोग करताना दिसते. त्यामुळे ती नेहमीच चाहत्यांच्या निशाण्यावर असते.
साऊथचा सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसनने बालकलाकार म्हणून तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तेलुगू आणि तमिळ तसेच हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. हिंदी सिनेमात तिला हवे तसे यश मिळाले नाही. पण दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तिने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे अभिनयातच नाहीतर गायनातही तिला प्रचंड रस आहे.श्रुती एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम गायिका देखील आहे.