'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 11:35 AM2024-05-01T11:35:52+5:302024-05-01T11:36:25+5:30

'शिवा' (Shiva Serial) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आता या मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.

'Shiva' series takes an interesting turn, Shiva and Ashu's friendship will become stronger! | 'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होणार!

'शिवा' मालिका रंजक वळणावर, शिवा आणि आशूची मैत्री अजूनच घट्ट होणार!

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली नवीन मालिका 'शिवा' (Shiva Serial) लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज आहे. प्रत्येक पात्राला अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. आता ही मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.  आता या मालिकेत खूप रंजक गोष्टी घडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. 

शिवा मालिकेत किर्तीला चंदन आणि दिव्याच्या प्रेमाबद्दल कळत, ती प्रिया आणि सुहाससोबत मिळून दिव्याच भांडाफोड करायचा प्लॅन बनवते. इकडे बिझनेसमध्ये लक्ष नसल्याने रामभाऊ आशुवर चिडतात आणि आशु घर सोडून बाहेर पडतो. शिवाच्या सांगण्यावरून आशुला पटत की बाबांच्या माझ्याकडून काही अपेक्षा आहेत  म्हणून तो जाऊन क्लाएंटशी मीटिंग करतो, आणि ती मिटिंग यशस्वी होते. 

सीताई शिवाच्या घरी कामानिमित्त गेली असता तिला घरातून बाहेर पडणारी शिवा दिसते, ती शिवा बद्दल विचारपूस करते तेव्हा शिवा शेजारी राहते असं वंदना खोट बोलते. सीताई दिव्याला शिवापासून दूर राहायचा सल्ला देते. इकडे वस्तीत होणार्‍या क्रिकेट टूर्नामेंट  मध्ये शिवा, गॅंग, आशु आणि मांजा भाग घेतात आणि त्यातून मिळणाऱ्या रकमेतून वस्तीतील मुलांना शाळेच साहित्य आणायचं ठरवतात. तिथे शिवा आणि आशूची  मैत्री अजूनच घट्ट होते.  
आता या घट्ट मैत्रीचे रूपांतर प्रेमात होईल ? शिवा- आशुच्या नात्यात काय बदल घडेल ? 'शिवा' दररोज रात्री ९ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहायला मिळेल.

Web Title: 'Shiva' series takes an interesting turn, Shiva and Ashu's friendship will become stronger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.