शिल्पाला मुलाने म्हटले, ‘सिली मम्मा’
By Admin | Updated: April 25, 2017 23:54 IST2017-04-25T23:50:21+5:302017-04-25T23:54:56+5:30
अभिनेत्री शिल्पा शेट्टी जरी चित्रपटांमधून गायब असली, तरी ती तिच्या परिवारासोबत नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असते. पती आणि मुलांसोबतचे

शिल्पाला मुलाने म्हटले, ‘सिली मम्मा’
अभिनेत्री शिल्पा शेट्टी जरी चित्रपटांमधून गायब असली, तरी ती तिच्या परिवारासोबत नेहमीच कुठे ना कुठे स्पॉट होत असते. पती आणि मुलांसोबतचे काही आनंदाचे क्षण ती तिच्या फॅन्सबरोबर नेहमीच शेअर करताना दिसते. शिल्पाने असाच काहीसा मुलगा वियानबरोबरचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये वियान मम्मा शिल्पाला असे काही म्हणताना दिसत आहे की, शिल्पाबरोबर तिच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनाही हसू आवरणे मुश्कील होत आहे. वास्तविक हा व्हिडिओ कुठल्यातरी मॉलमधील असल्याचे दिसत आहे. या मॉलमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या पोस्टरला बघून वियान सांगत आहे की, ही एक फेमस अॅक्टर असून, माझी फेव्हरेट आहे. वियान त्याच्या धुनमध्येच दीपिकाच्या पोस्टरचे कौतूक करत असतो, तेवढ्यात शिल्पा त्याच्या जवळ येत त्याला थांबविण्याचा प्रयत्न करते. मात्र, यावर वियान शिल्पाला जे म्हणतो ते ऐकून तिच्यासह आजूबाजूला असलेल्या लोकांना हसू आवरणे मुश्कील होते. वियान शिल्पाला ‘शिली मम्मा’ असे म्हणतो. वियानचे हे शब्द जेवढे धक्कादायक वाटतात तेवढेच क्युटही वाटतात. पुढे वियान मम्मा शिल्पाचा हात धरून पुढे निघून जातो. मात्र वियानचे हे शब्द खूप हसविणारे आहेत. शिवाय, वियान किती बोलका आहे हेही यावरून स्पष्ट होते.