'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:26 IST2025-12-22T15:25:19+5:302025-12-22T15:26:02+5:30

शिल्पा शिंदेने १० वर्षांपूर्वीच सोडलेली मालिका, आता कमबॅक केल्यावर म्हणाली...

shilpa shinde back on bhabhiji ghar par hain serial gave emotional reaction on her comeback | 'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."

'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."

'भाभीजी घर पर है' या लोकप्रिय मालिकेत ओरिजनल अंगुरी भाभी म्हणजे अभिनेत्री शिल्पा शिंदे परत आली आहे. १० वर्षांनंतर तिने पुन्हा मालिकेत एन्ट्री घेतली आहे. यामुळे चाहते खूप खूश झाले आहेत. तिला पुन्हा अंगुरी भाभीच्या भूमिकेत पाहण्यासाठी, तिची बोलण्याची स्टाईल यासाठी चाहते उत्सुक आहेत. आपल्या कमबॅकवर स्वत: शिल्पाही भावुक झाली आहे. नुकतीच तिने यावर प्रतिक्रिया दिली.

आजपासून 'भाभीजी घर पर है २.०' सुरु होत आहे. नव्या आणि मजेशीर गोष्टीसह प्रेक्षकांना जुनी अंगुरी भाभी पाहायला मिळणार आहे. याबद्दल माध्यमांशी बोलताना शिल्पा शिंदे म्हणाली, "१० वर्षच काय २० वर्षही लागू शकत होते कारण मी परत येईन गा विचारच केला नव्हता."

प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल ती म्हणाली,"मी हे कमावलं आहे. मी सत्याचा रस्ता अवलंबला जो खूप कठीण असतो. पण मला हे माहित होतं की मी काहीही चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे माझ्यासोबत काहीही चुकीचं होणार नाही. प्रेक्षक मला पाहून ज्याप्रकारे खूश झाले आहेत तर मी सांगू इच्छिते की मी प्रेक्षकांसाठीच परत आले आहे."

ती पुढे म्हणाली, "मी प्रेक्षकांना हसवायला आले आहे. त्यांच्या ज्या आशा आकांक्षा संपल्या होत्या त्या पुन्हा जाग्या करायला आले आहे. जेव्हा माझी इच्छा होती तेव्हा मला कोणीच करु दिलं नाही. पण मी सगळ्या गोष्टी सकारात्मकतेने घेतल्या. 

Web Title : 'भाभीजी घर पर हैं' में शिल्पा शिंदे की वापसी, हुई भावुक।

Web Summary : शिल्पा शिंदे, ओरिजिनल अंगूरी भाभी, 10 साल बाद 'भाभीजी घर पर हैं' में वापस आ गई हैं। उन्होंने खुशी व्यक्त की और कहा कि वह हमेशा सच्चाई के लिए खड़ी रहीं, अपने प्रशंसकों के लिए लौटीं और उनकी मुस्कान वापस लाने के लिए।

Web Title : Shilpa Shinde returns to 'Bhabiji Ghar Par Hai,' gets emotional.

Web Summary : Shilpa Shinde, the original Angoori Bhabhi, is back on 'Bhabiji Ghar Par Hai' after 10 years. She expressed her happiness and stated that she always stood for the truth, returning for her fans and to bring back their smiles.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.