शिल्पा शेट्टीनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या सुरक्षेसाठी केली विशेष पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2024 03:10 PM2024-05-08T15:10:35+5:302024-05-08T15:11:22+5:30

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आई सुनंदासोबत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. 

Shilpa Shetty Perform Special Puja At Assam Kamakhya Temple After Ed Action On Husband Raj Kundra | शिल्पा शेट्टीनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या सुरक्षेसाठी केली विशेष पूजा

शिल्पा शेट्टीनं कामाख्या देवीचं घेतलं दर्शन, ED च्या कारवाईनंतर राज कुंद्राच्या सुरक्षेसाठी केली विशेष पूजा

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) वर अलिकडेच अंमलबजावणी संचालनालय (Directorate of Enforcement) कडून मोठी कारवाई करण्यात आली. ईडीनं राज कुंद्रा याची  ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त (Property Seized) केली होती. यातच आता बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं आई सुनंदासोबत कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. 

शिल्पाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये शिल्पा शेट्टी मंदिरातील रितीरिवाजानुसार विशेष पूजा करताना दिसत आहे. यासोबतच तिनं मंदिराच्या अधिकाऱ्यांसोबतचाही फोटो पोस्ट केला आहे. यावेळी शिल्पा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आली.  शिल्पाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिल्पानं ही पुजा पती राजच्या सुरक्षेसाठी केली असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. 

ईडीने गेल्या महिन्यात एप्रिल २०२४ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात राज कुंद्रावर कारवाई केली. जुहूमधील शिल्पा शेट्टी यांच्या नावे असलेला फ्लॅट, पुण्यातील बंगला तसेच इक्विटी शेअर्सही ईडीकडून जप्त करण्यात आले. राज कुंद्रावर बिटकॉइन घोटाळा केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याआधी पॉर्नोग्राफी प्रकरणात २०२१ साली राज कुंद्राला अटक केली होती.  याप्रकरणी तो २ महिने जेलमध्ये होता. सप्टेंबर २०२१मध्ये त्याची जेलमधून सुटका झाली होती. 

शिल्पा शेट्टी ही खूप अध्यात्मिक आहे. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसिरीजमध्ये ती झळकली आहे. या वेब सीरिजमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि विवेक ओबेरॉय हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय शिल्पाने 'केडी - द डेव्हिल' देखील साइन केले आहे. ज्यामध्ये ती सत्यवतीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात ध्रुव सर्जा, शिल्पा शेट्टी, व्ही रविचंद्रन आणि संजय दत्त यांच्याही भूमिका आहेत.

Web Title: Shilpa Shetty Perform Special Puja At Assam Kamakhya Temple After Ed Action On Husband Raj Kundra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.