Oscar 2022 : ‘ऑस्करवारी’ची तयारी! ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 04:22 PM2021-10-21T16:22:10+5:302021-10-21T16:23:14+5:30

Oscar 2022 : ऑस्करवारीसाठी 14 सिनेमे शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. यापैकी एक सर्वोत्तम सिनेमा भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे.

Sherni and Sardar Udham shortlisted for India's official entry to Oscars 2022 | Oscar 2022 : ‘ऑस्करवारी’ची तयारी! ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?

Oscar 2022 : ‘ऑस्करवारी’ची तयारी! ‘शेरनी’ की ‘सरदार उधम’ कोण मारणार बाजी?

googlenewsNext
ठळक मुद्देअमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकानं ‘शेरनी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात अभिनेत्री विद्या बालन एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत आहे.

दरवर्षी ऑस्कर ( Oscar 2022) पुरस्कारासाठी भारतीय सिनेमांची निवड केली जाते. पुढील वर्षी 27 मार्चला ऑस्कर सोहळा (94th Academy Awards) रंगणार आहे. त्याआधी पुढील वर्षीच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारतीय सिनेमाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सोमवारी या प्रक्रियेअंतर्गत 14 सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यापैकी एक सिनेमा ऑस्करला पाठवण्यात येणार आहे.
 शॉर्टलिस्ट झालेल्या 14 सिनेमांमध्ये विद्या बालनचा ‘शेरनी’ (Sherni ) आणि विकी कौशलचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘सरदार उधम’  (Sardar Udham) या दोन चित्रपटांही  समावेश आहे.  
शाजी एन. करन यांच्या अध्यक्षतेखालील फिल्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या 15 सदस्यांची ज्युरी  ऑस्करच्या बेस्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगिरीसाठी एका सिनेमाची निवड करणार आहेत.

ज्युरी हे सर्व शॉर्टलिस्ट केलेले सर्व 14  सिनेमे पाहतील आणि यापैकी सर्वोत्तम चित्रपट भारताकडून अधिकृत एन्ट्री म्हणून ऑस्करवारीला (India's official entry to Oscars 2022) जाईल. ऑस्करवारीसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या 14 चित्रपटांमध्ये ‘शेरनी’ व ‘सरदार उधम’ या हिंदी चित्रपटांशिवाय ‘नायटू’ (मल्याळम ),   मंडेला (तामिळ) या चित्रपटांचा समावेश आहे. गेल्या वर्षी जोस पेलिसरी यांचं दिग्दर्शन असलेली ‘जल्लीकट्टू’ ऑस्करसाठी पाठवण्यात आली होती. पण हा सिनेमा ऑस्कर ज्युरीच्या फायनल लिस्टमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही.  
 
अमित मसुरकर या मराठमोळ्या दिग्दर्शकानं ‘शेरनी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. यात अभिनेत्री विद्या बालन एका फॉरेस्ट ऑफिसरच्या भूमिकेत आहे. एका नरभक्षक वाघाला पकडण्यासाठी ती प्रयत्न करत असते, त्यासाठी तिला अनेक सरकारी अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं, असं याचं कथानक आहे. तर विक्की कौशलचा ‘सरदार उधमसिंग’ या सिनेमाचं दिग्दर्शन शूजीत सरकार यांनी केलं आहे.   क्रांतीकारक सरदार उधमसिंग यांच्या जीवनावर बेतलेल्या या सिनेमात आधी अभिनेता इरफान खान मुख्य भूमिकेत दिसणार होता. मात्र त्यांच्या निधनानंतर विकी कौशलला निवडण्यात आलं.  

Web Title: Sherni and Sardar Udham shortlisted for India's official entry to Oscars 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.