"ही हिरोईनपेक्षा जरा जास्तच सुंदर दिसते...", म्हणत जान्हवी किल्लेकरला नाकारलं, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 18:44 IST2025-07-19T18:43:47+5:302025-07-19T18:44:20+5:30

Janhvi Killekar : अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने एका मुलाखतीत तिला सुंदर दिसते म्हणून प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगितले.

"She looks a little more beautiful than the heroine...", Janhvi Killekar was rejected, the actress expressed regret | "ही हिरोईनपेक्षा जरा जास्तच सुंदर दिसते...", म्हणत जान्हवी किल्लेकरला नाकारलं, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

"ही हिरोईनपेक्षा जरा जास्तच सुंदर दिसते...", म्हणत जान्हवी किल्लेकरला नाकारलं, अभिनेत्रीने व्यक्त केली खंत

अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Janhvi Killekar) मराठी टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे. तिला बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi)च्या घरातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. याशिवाय तिने 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेत काम केले. या मालिकेत तिने साकारलेली निगेटिव्ह भूमिका खूप गाजली. सध्या ती कलर्स मराठी वाहिनीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत काम करताना दिसते आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीत तिला सुंदर दिसते म्हणून प्रोजेक्टमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगितले.

जान्हवी किल्लेकरने सांगितले की, "ही हिरोईनपेक्षा जरा जास्तच सुंदर दिसते!... त्यामुळे 'ही' नको असं म्हणून त्यांनी मला नकार दिला होता. एक नंबर नावाची एक मालिका येणार होती. त्यात अभिनेत्रीच्या बहिणीची भूमिका मला मिळणार होती. माझ्या डोळ्यांमुळे मी सगळ्यांना व्हिलनच दिसते, माहित नाही का? आतापर्यंत मी केलेले सगळे रोल हे निगेटिव्हच आहेत. ती गोष्ट माझ्या मनाला खूप लागली की 'मी चांगली दिसते' म्हणून तुम्ही मला काढून टाकत आहात." 

"त्या लोकांनी मला खूप नाचवलं..."

ती पुढे म्हणाली की, "त्या लोकांनी मला खूप नाचवलं. दररोज येणं, ऑडिशन देणं, लूक टेस्ट करणं एवढं सगळं करून पण म्हणतात की, 'तुझं काहीच नाही होणार'. मग तुम्ही ते मला आधीच सांगायला हवं होतं ना. 'मी नाकातून बोलते' हेही अनेकजण मला म्हणायचे. याकडे मी थोडं लक्ष दिलं, त्यामुळे मी सीन कसा झाला हे जाऊन लगेचच बघायचे."

Web Title: "She looks a little more beautiful than the heroine...", Janhvi Killekar was rejected, the actress expressed regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.