शरद केळकरचा २९ वर्ष छोट्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; ट्रोलिंगवर म्हणाला, "या वयात मानसिकता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 16:04 IST2026-02-16T16:03:12+5:302026-02-16T16:04:00+5:30
वयाच्या ४९ व्या वर्षी शरदचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स

शरद केळकरचा २९ वर्ष छोट्या अभिनेत्रीसोबत रोमान्स; ट्रोलिंगवर म्हणाला, "या वयात मानसिकता..."
अभिनेता शरद केळकर मराठी आणि हिंदी माध्यमातही लोकप्रिय आहे. ८ वर्षांनी त्याने टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. 'तुम से तुम तक' मालिकेत तो दिसत आहे. या मालिकेत तो २९ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स करत आहे. यावरुन त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. या नकारात्मक टिप्पणीवर आता शरद केळकरने प्रतिक्रिया दिली आहे.
'तुम से तुम तक' मालिकेत शरद केळकरने आर्यवर्धनच्या भूमिकेत आहे. तर त्याच्यासोबत अभिनेत्री निहारिका चौकसे आहे जी अनुच्या भूमिकेत आहे. शरद ४९ वर्षांचा असून निहारिका २० च वर्षांची आहे. मालिकेत ही जोडी असणार याची घोषणा झाली तेव्हापासूनच खूप ट्रोलिंग सुरु झालं होतं. लोकांच्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या. या ट्रोलिंगवर शरद केळकर म्हणाला, "मला वाटतं मी या मालिकेत एकदम फिट बसतो. मी पन्नाशीच्या टप्प्यावर आहे त्यामुळे मी मालिकेतील भूमिका जास्त समजू शकतो. ४०-४५ वर्षांच्या माणसाची मानसिकता मला समजते. समाजात असे काही कपल आहेत ज्यांच्या वयात खूपल अंतर आहे. तरीसुद्धा त्यांचं नातं यशस्वी झालं आहे. हा शो कोणाचा बायोपिक नाही. अशा प्रकारची लव्हस्टोरी सांगताना लेखकाची संकल्पना आणि दिग्दर्शकाची पद्धत महत्वाची असते."
तो पुढे म्हणाला, "चॅनल किंवा मेकर्स प्रेक्षकांच्या आवडीनुसारच एखादा शो आणत असतात. यासाठी बरंच रिसर्च आणि अॅनालिसिस होतं. प्रेक्षकांची आवड समजून घेतल्यानंतर शो बनवण्याची प्रक्रिया सुरु होते. जेव्हा मालिका लेखकांना त्यांचा हक्क मिळत नाही हे पाहून मला वाईट वाटतं. त्यांना सतत प्रोत्साहन दिलं पाहिजे. जेणेकरुन ते त्यांच्या कलेत बेस्ट करतील. त्यांच्या ओरिजनल स्क्रिप्टमध्ये हस्तक्षेप करणं हे खूप दु:खद आहे."
शरद केळकरची 'तुम से तुम तक' हा मालिका मराठी मालिकेचाच रिमेक आहे. सुबोध भावे आणि गायत्री दातारची मालिका 'तुला पाहते रे'वरुनच ही मालिका घेण्यात आली आहे.