काजोल-ट्विंकलच्या शोमध्ये का आला नाही शाहरुख खान? आता कारण सांगत म्हणाला, "खरं तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:15 IST2025-12-06T14:14:50+5:302025-12-06T14:15:24+5:30
मैत्रिणींच्या शो मध्ये का आला नाही शाहरुख खान?

काजोल-ट्विंकलच्या शोमध्ये का आला नाही शाहरुख खान? आता कारण सांगत म्हणाला, "खरं तर..."
बॉलिवूडच्या दोन प्रसिद्ध अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना. दोघीही अगदीच रोखठोक, चुलबुल स्वभावाच्या आहेत. नेहमी बिंधास्त वक्तव्य करणाऱ्या या अभिनेत्रींचा नुकताच एक चॅट शो आल होता. 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' असं शोचं नाव होतं. या शोमध्ये सलमान, आमिर, अक्षय कुमार, सैफ अली खान, विकी कौशल, क्रिती सेनन, जान्हवी कपूर, आलिया भट अशा अनेक कलाकारांनी हजेरी लावली. शाहरुख खाननेही शोमध्ये असं सगळ्यांनाच वाटलं होतं. आता किंग खानने न येण्याचं कारण सांगितलं आहे.
नुकतंच 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या आयकॉनिक सिनेमाला ३० वर्षा पूर्ण झाली. यानिमित्त लंडनमध्ये राज-सिमरनच्या ब्राँझ पुतळ्याचं अनावरण शाहरुख आणि काजोलच्या हस्ते करण्यात आलं होतं. यानंतर बीबीसी एशियन नेटवर्कशी बोलताना शाहरुख खानने काजोल आणि ट्विंकलच्या शोमध्ये न जाण्याचं कारण सांगितलं. तो म्हणाला, "मी सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र होतो. हे मी काजोलला तेव्हाच कळवलं होतं. त्यावेळी मला दुखापतही झाली होती." मग काजोल म्हणाली, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर वेळेची अडचण होती'.
पुढे शाहरुख म्हणाला, "मला खरंच खूप वाईट वाटलं. शोमधला फक्त तो खाण्याचा पार्ट सोडला तर मला जायची फार इच्छा होती. तिथे इतकं काय काय खायला होतं. पण खरंच काजोल आणि ट्विंकलची मी माफी मागतो. मी शोवर यायला हवं होतं. हा पण मी शोचे चार एपिसोड्स पाहिले. मी बघत राहिलो. शोवर जाऊ शकलो नाही ही माझ्यासाठीही एक शिक्षाच आहे."
शाहरुख खान आगामी 'किंग' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये लेक सुहाना खानही आहे. शिवाय अभय वर्मा, अभिषेक बच्चन, दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत.