'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:44 IST2025-12-10T11:43:20+5:302025-12-10T11:44:12+5:30
दुबईतील एका इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि फराह खान सहभागी झाले होते.

'किंग'मध्ये लेक सुहानाला ॲक्शनचे धडे देतोय शाहरुख खान, फराह खान म्हणाली...
शाहरुख खानच्या 'किंग' सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. सिनेमात त्याची लेक सुहानाही आहे. शाहरुखचा सिनेमातील फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी समोर आला होता. 'डर नही दहशत है' या त्याच्या डायलॉगने वेड लावलं. ग्रे हेयर लूक, माफियासारखा वाटावा असा तो 'किंग'मध्ये दिसत आहे. गेल्या महिन्यात शाहरुखच्या वाढदिवशी लूक रिव्हील करण्यात आला होता. सिनेमात सुहानाची नक्की काय भूमिका आहे हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. शाहरुख लेकीला स्वत: प्रशिक्षण देत असल्याचा खुलासा फरहान खानने नुकताच केला.
दुबईतील डॅन्यूब इव्हेंटमध्ये शाहरुख खान आणि फराह खान सहभागी झाले होते. इव्हेंटमधला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये फराह खान म्हणते, "शाहरुखचा मुलगा आर्यनने बॅड्स ऑफ बॉलिवूड ही जबरदस्त वेब सीरिज बनवली. सुहानाही किंग साठी खूप मेहनत घेत आहे. मला माहितीये शाहरुख तू तिला अॅक्शन सीन्ससाठी प्रशिक्षण देत आहेस."
#SuhanaKhan getting trained for action by the very best, the #KING himself 👑❤️
— Kamina Adi 🤖 (@KaminaAdi) December 9, 2025
@justSidAnand Keep cooking and serve us hardcore nasha lord 💣🔥🔥🔥 pic.twitter.com/pxcq80vx9i
सुहाना खानने २०२३ साली 'द आर्चीज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला होता. आता ती थेट किंग मध्ये दिसणार आहे. यासाठी ती खूप मेहनत घेत आहे. वडिलांसोबत ती पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहे. सिनेमातील सुहानाचा लूक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
दरम्यान 'किंग'मध्ये शाहरुख खान, सुहानासोबतच अभिषेक बच्चन, अभय वर्मा, दीपिका पादुकोण यांचीही भूमिका आहे. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होणार आहे.