किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:34 AM2024-05-01T10:34:58+5:302024-05-01T10:36:58+5:30

बॉलिवूडच्या किंग क्रिकेटच्या किंग बद्दल काय म्हणतो?

Shahrukh Khan calls Virat Kohli son in law he was there when anushka and virat were dating | किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार

किंग खान King Kohli ला म्हणाला 'जावई', अनुष्का-विराटच्या नात्याचा शाहरुख होता साक्षीदार

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं (Shahrukh Khan) क्रिकेटशीही खास नातं आहे. आयपीएल IPL मध्ये कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या टीमचा तो मालक आहे. अनेकदा आयपीएलवेळी शाहरुखला खेळाडूंसोबत गप्पा मारताना पाहण्यात आलंय. एकदा शाहरुखने विराट कोहलीलाबॉलिवूडचा जावई असे संबोधले होते. अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा डेटिंगचा काळ शाहरुखने जवळून पाहिला असल्याने तो दोघांच्या फार जवळ आहे असं तो म्हणाला.

विराटबद्दल बोलताना शाहरुख एका मुलाखतीत म्हणाला होता की, "मी विराटसोबत खूप वेळ घालवला आहे. मला तो खूप आवडतो. तो आमचा जावई असल्यासारखाच आहे. इतर खेळाडूंपेक्षा जास्त मी विराट कोहलीला ओळखतो. विराट आणि अनुष्का दोघांना मी बराच काळापासून ओळखतो. ते दोघंही एकमेकांना डेट करत होते तेव्हा मी आणि अनुष्का सिनेमात काम करत होतो. त्यामुळे विराट बरेच दिवस आमच्यासोबत असायचा."

शाहरुख पुढे म्हणाला, "मी पठाण गाण्यातली हुक स्टेप त्याला शिकवली. एका मॅचमध्ये तो रविंद्र जडेजासोबत ही डान्स स्टेप करताना मी त्याला पाहिलं होतं. ते फारच वाईट पद्धतीने स्टेप करत होते. मी त्यांना म्हटलं की मी तुम्हाला स्टेप शिकवतो म्हणजे पुढच्या वर्ल्ड कप आणि इतर मॅचवेळी जेव्हा तुम्ही स्टेप कराल तेव्हा तुम्ही मला स्टेप शिकण्यासाठी फोन तरी कराल."

अनुष्का शर्माने 2008 साली 'रब ने बना दी जोडी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर दोघांनी 'झिरो','जब तक है जान','जब हॅरी मेट सेजल','ऐ दिल है मुश्किल' सिनेमांमध्ये काम केलं. शाहरुख आणि अनुष्का एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यामुळे आपसूकच विराटसोबतही शाहरुखची गट्टी जमली.

Web Title: Shahrukh Khan calls Virat Kohli son in law he was there when anushka and virat were dating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.